याच कारणामुळे प्रियांका चोप्राच्या दिराच्या बॅचलर पार्टीमध्ये तीनवेळा आले पोलीस

जो जोनस आणि सोफी टर्नरने याचवर्षी १ मे रोजी लास वेगासमध्ये लग्न केलं. दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा न करताच अचानक लग्न केलं होतं.

जो जोनस आणि सोफी टर्नरने याचवर्षी १ मे रोजी लास वेगासमध्ये लग्न केलं. दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा न करताच अचानक लग्न केलं होतं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 जून- प्रियांका चोप्रा दरदिवशी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी ती दीर जो जोनासमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी जो जोनास आणि सोफी टर्नर यांनी अचानक लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता जोच्या लग्नाशी निगडीत अजून एक बातमी समोर आली आहे. जोच्या भावांनीच त्याच्या लग्नाचा हा किस्सा सर्वांना सांगितला. जो आणि सोफीच्या बॅचलर पार्टीमध्ये असं काही झालं काही पोलीस एक दोनदा नाही तर तब्बल तीनवेळा आली होती. हेही वाचा- Airport Diaries- प्रियांका चोप्रा अमेरिकेला रवाना, यावेळचा लुक होता थोडा वेगळा त्याचं झालं असं की, प्रियांकाचा नवरा निक जोनस आणि तिचा दुसरा दीर केविन जोनस एका चॅट शोमध्ये गेले होते. यावेळी दोन्ही भावांनी जो जोनसच्या बॅचलर पार्टीचा एक भन्नाट किस्सा सांगितला. निक म्हणाला की, जोच्या लग्नाआधी स्पेनच्या एका सुंदर आयलंडवर बॅचलर पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत तुफान मजा मस्ती करण्यात आली. पण यावेळी स्वतः होस्टलाच तीनवेळा पोलिसांना फोन करून बोलवावे लागले होते. निक म्हणाला की, पार्टीत सगळ्यांचाच स्वतःवरचा ताबा सुटला होता. जोने तर त्याचं शर्टही फाडलं होतं. एवढंच नाही तर जोने त्याच्या मित्रांचे शर्टही फाडले होते. यानंतर तो शांत बसला नाही तर विचीत्र चाळे करू लागला. निकचं हे बोलणं ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हेही वाचा- VIDEO- क्रिकेट ग्राउंडवर रणवीर गाळतोय घाम तर दीपिका इन्स्टाग्राममध्ये बिझी जो जोनस आणि सोफी टर्नरने याचवर्षी १ मे रोजी लास वेगासमध्ये लग्न केलं. दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा न करताच अचानक लग्न केलं होतं. त्यांचं लग्न झाल्यानंतरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यावरूनच दोघांनी लग्न केल्याचं त्यांच्या चाहत्यांना कळलं. World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण
    First published: