मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

...म्हणून प्रियांकानं 'भारत'शी केली दगाबाजी

...म्हणून प्रियांकानं 'भारत'शी केली दगाबाजी

प्रियांका महागड्या गाड्यांचीही आवड आहे. तिच्याकडे सध्या पोर्शे, बीएमडब्ल्यू 7- सीरीज, मर्सिडीज- एस क्लास या गाड्या आहेत.

प्रियांका महागड्या गाड्यांचीही आवड आहे. तिच्याकडे सध्या पोर्शे, बीएमडब्ल्यू 7- सीरीज, मर्सिडीज- एस क्लास या गाड्या आहेत.

प्रियांकानं सिनेमा का सोडला याची चर्चा सुरू झाली. आणि तिला निकशी लग्न करायचंय आॅक्टोबरमध्ये हे कारण पुढे आलं. किंवा तसं भासवलं गेलं. खरं कारण वेगळंच आहे.

मुंबई, 01 आॅगस्ट : प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडला. आणि सलमान खान भडकला. आणि ते साहजिकच होतं म्हणा, आता भारतचं शूटिंग सुरू झालं आणि प्रियांकानं सिनेमातून काढता पाय घेतला. सलमानचे वडील सलीम खानही भडकले होते. म्हणाले, तिच्या जागी दुसरं कुणीही येईल आणि झालंही असंच. लगेच कतरिना कैफ तिच्या जागी आलीच की! मग प्रियांकानं सिनेमा का सोडला याची चर्चा सुरू झाली. आणि तिला निकशी लग्न करायचंय आॅक्टोबरमध्ये हे कारण पुढे आलं. किंवा तसं भासवलं गेलं. खरं कारण वेगळंच आहे. प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. खरं तर प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.
First published:

Tags: Hollywood, Priyanka chopra, Salman khan, प्रियांका चोप्रा, भारत, हाॅलिवूड

पुढील बातम्या