प्रियांका करतेय बाॅलिवूडचा दुसरा सिनेमा, 'या' अभिनेत्याबरोबर करणार काम

प्रियांका करतेय बाॅलिवूडचा दुसरा सिनेमा, 'या' अभिनेत्याबरोबर करणार काम

सलमान खानसोबत भारत या सिनेमाच्या शूटिंगला 17 जुलैला सुरुवात होतेय. यासोबत प्रियांकाने आणखी एक सिनेमा साईन केलाय. मार्गारेटा विथ अ स्ट्रॉची दिग्दर्शिका शोनाली बोस यांच्या आगामी सिनेमात प्रियांका झळकणार आहे.

  • Share this:

मुंबई, ०९ जुलै : प्रियांका चोप्रा भारतात परत आलीय, आणि आता ती सुट्टीसाठी नाही तर कामासाठी परत आलीय. सलमान खानसोबत भारत या सिनेमाच्या शूटिंगला 17 जुलैला सुरुवात होतेय. यासोबत प्रियांकाने आणखी एक सिनेमा साईन केलाय. मार्गारेटा विथ अ स्ट्रॉची दिग्दर्शिका शोनाली बोस यांच्या आगामी सिनेमात प्रियांका झळकणार आहे. प्रियांकासोबत यात फरहान अख्तर असेल आणि झायरा वसीम या दोघांच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल, अशी चर्चा आहे.

प्रियांका चोप्राने बॉलिवूडच्या दोन सिनेमांवर काम सुरु केलंय,त्यामुळे आता काही काळ ती भारतातच असेल आणि कामात व्यग्र असेल. इन्स्टाग्रामवर शोनाली बोस यांच्या सिनेमाच्या स्क्रिप्टचा फोटो टाकत प्रियांकाने नव्या सिनेमाची माहिती स्वत:च दिलीय. या सिनेमाचं नाव द स्काय इज पिंक आहे असं या फोटोवरून कळतंय.

हेही वाचा

मुंबईत पाऊस की 'पावसात मुंबई' !

'संजू' सिनेमासाठी संजय दत्तनं घेतले 'इतके' कोटी!

photos : संगीता बिजलानी आणि सलमानच्या लग्नाची आमंत्रण पत्रिकाही तयार होती पण...

हाॅलिवूडमध्ये प्रियांका चोप्रानं स्वत:चं एक स्थान निर्माण केलंय. आता पुन्हा बाॅलिवूडकडे वळून ती फॅन्सना छान ट्रीट देणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading