Home /News /entertainment /

'माझे वडिल मशीदीत गाणी गायचे', या अजब दाव्यामुळे प्रियांका चोप्रा होतेय ट्रोल

'माझे वडिल मशीदीत गाणी गायचे', या अजब दाव्यामुळे प्रियांका चोप्रा होतेय ट्रोल

माझे वडिल एका मशीदीत गाणी (My father used to sing in mosque) गायचे, असा अजब दावा बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) केला आहे. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केलं आहे.

    नवी दिल्ली, 20 मार्च : बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच ऑपराह विन्फ्रेला (Oprah Winfrey) एक मुलाखत (Interview) दिली आहे. या मुलाखतीत  प्रियांका चोप्राने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहे. यामध्ये तिने आपले वडिल अशोक चोप्रा (Father Ashok Chopra) यांच्याबद्दलही सांगितलं आहे. तिने सांगितलं की, तिचे वडिल मशीदीत गाणी (Used to sing in mosque) गायचे. प्रियांकाच्या या मुलाखतीचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. प्रियांकाने प्रोमोमध्ये (Viral Promo) केलेल्या दाव्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Troll) करायला सुरुवात केली आहे. प्रियांकाच्या वक्तव्याबाबत अनेकांनी विविध प्रश्न उपस्थितीत केले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांकाने ऑपराह विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत, तिचं पुस्तक Unfinished, तिचं बालपण यांसारख्या अनेक मुद्यावर तिने संवाद साधला आहे. या मुलाखतीत ऑपराहने प्रियांकाला तिच्या लहानपणीच्या आध्यात्मिक जडणघडणीबाबत विचारलं होतं. यावेळी प्रियांकाने सांगितलं की, 'मला वाटतं, भारतात राहून आध्यात्माशी न जोडलं जाणं खूप कठिण गोष्ट आहे. तिथे आजूबाजूला विविध धर्माची लोकं असतात, आणि आध्यात्म हे त्या लोकांमध्ये सामावलेलं आहे.' (वाचा -‘शाहरुखमुळं आज मला गाता येतं’; शिल्पा शेट्टीनं सांगितला बाजीगरमधील किस्सा) यावेळी प्रियांकाने सांगितलं की, 'मी कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे क्रिस्टीएनिटीबद्दल मला माहिती मिळाली होती. तसंच माझे वडिल एका मशीदीत गायचं काम करायचे. त्यामुळे मला इस्लामबाबतही कळालं. तर मी एका हिंदू धर्मात वाढली आहे, त्यामुळे हिंदू धर्माबाबतही मला माहित आहे. अशाप्रकारचं आध्यात्म भारताचा खूप मोठा भाग आहे. ज्याला आपण नाकारू शकत नाही.'  प्रियांकाच्या या अजब वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलचं घेरलं असून तिच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Priyanka chopra

    पुढील बातम्या