Elec-widget

प्रेग्नन्सी आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रियांका चोप्रानं केला मोठा खुलासा

प्रेग्नन्सी आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रियांका चोप्रानं केला मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरुन ती प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावला जात होता

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर :  बॉलिवूडची देसी गर्ल जवळपास 3 वर्षांनंतर 'The Sky is Pink' या सिनेमातून कमबॅक करत आहे. पण सध्या ती तिच्या कामापेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत असते. निक-प्रियांकाशी संबंधित कोणतीही गोष्ट चर्चेचा विषय ठरते. मागच्या काही काळापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा रंगत आहेत. पण 'The Sky is Pink' च्या प्रमोशनमध्ये प्रियांकानं तिच्या वैवाहिक जीवनाविषयी मोठा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरुन ती प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र यावर प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या सर्व अफवा फेटाळून लावत प्रियांका प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण आता प्रियांकानं स्वतःच या सगळ्याचा खुलासा करत वैवाहिक जीवनाशीसंबंधी अनेक गोष्टी मीडियाशी शेअर केल्या.

यावेळी आपल्या करिअरविषयी प्रियांका म्हणाली, मी नुकताच एक हॉलिवूड सिनेमा साइन केला आहे. याशिवाय माझ्या प्रोजेक्टमध्ये एका इंग्रजी वेब सीरिजचाही समावेश आहे. सध्या तरी माझं पूर्ण लक्ष हातात असलेल्या प्रोजेक्ट्सवर आहे आणि मी असून किती दिवस काम करत राहणार आहे. मला फॅमिली प्लानिंग सुद्धा करायचं आहे. त्यामुळे सहाजिकच हे सर्व प्रोजेक्ट संपल्यावर मी बाळाचा विचार करणार आहे.

Loading...

प्रियांकानं या मुलाखतीत स्पष्ट केलं की, तिचं वैवाहिक जीवन खूप चांगलं चाललं आहे आणि तिचं लक्ष कामापेक्षा पर्सनल लाइफवर जास्त आहे. कामाच्या व्यापात प्रियांका तिच्या फॅमिली लाइफवर दुर्लक्ष करण्याच्या तयारीत अजिबात नाही. प्रियांका सध्या लवकरात लवकर सर्व प्रोजेक्ट संपवून पर्सनल लाइमध्ये नव्या पाहूण्याचं स्वागत करण्याचा विचार करत आहे.

=============================================================

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...