25 एप्रिल : देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच हॉलिवूडची कामं आटपून ती मायदेशी परतली आहे.आता ती बॉलिवूडच्या कामांना सुरुवात करणार असल्याचं समजतंय. पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये पिसी झळकणार आहे. मुंबईत परतल्यावर अखेर तिने हा सिनेमा साईन केलाय.
हरियाणात जन्मलेली कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय स्त्री होती. परत येताना मात्र यानामध्ये बिघाड झाल्यानं अपघातात तिचा मृत्यू झाला.
प्रिया मित्रनं कल्पना चावलावर सिनेमा बनवण्यासाठी 2011मध्ये चॅनेलची नोकरी सोडली. या सिनेमासाठी तिनं दिवस-रात्र एक केले. सरतेशेवटी प्रियांका चोप्रानं सिनेमाला होकार दिला, त्यामुळे प्रिया कमालीची खूश आहे.
अंतराळवीरावर बनणारा दुसरा सिनेमा आहे 'चंदामामा दूर के'. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा