प्रियांकाची नवी इनिंग, भारतात सुरू करणार डेटिंग अॅप

प्रियांकाची नवी इनिंग, भारतात सुरू करणार डेटिंग अॅप

प्रियांका आता बनलीय गुंतवणूकदार. तिनं अमेरिकेच्या दोन टेक्नाॅलाॅजीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलीय.

  • Share this:

मुंबई, 04 आॅक्टोबर : प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. सिनेमासंबंधी किंवा हल्ली बऱ्याचदा निकबरोबर कुठे गेली याबद्दलच जास्त बातम्या असतात. पण आता बातमी वेगळी आहे. प्रियांका चोप्राची नवी इनिंग सुरू होतेय.

प्रियांका आता बनलीय गुंतवणूकदार. तिनं अमेरिकेच्या दोन टेक्नाॅलाॅजीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलीय. परदेशी वर्तमानपत्रातला मजकूर इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत ती म्हणते, ' माझ्यासाठी हा नवा चॅप्टर आहे. टेक स्पेसच्या दोन कंपनीज सोबत मी गुंतवणूकदार म्हणून जोडली गेलीय. मला हा माझा मोठा सन्मान वाटतोय.'

या दोन कंपन्यांपैकी एक आहे सॅन फ्रँसिस्कोची टेक स्टार्टअप कंपनी होल्बर्टन. ही कोडिंग एज्युकेशन कंपनी आहे आणि दुसरी आहे बंबल. ही डेटिंग अॅपची कंपनी आहे. न्यूयाॅर्क टाइम्सच्या बातमीनुसार बंबल हे डेटिंग अॅप प्रियांका भारतातही सुरू करणारेय.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

First published: October 4, 2018, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading