प्रियांका चोप्राच्या आसाम टुरिझम कॅलेंडरवरच्या 'या' फोटोला काँग्रेसचा आक्षेप

प्रियांका चोप्राच्या आसाम टुरिझम कॅलेंडरवरच्या 'या' फोटोला काँग्रेसचा आक्षेप

या फोटोमध्ये प्रियांकाने पारंपारिक मेखेला चादर घालण्याऐवजी ड्रेस परिधान केला आहे.

  • Share this:

21 फेब्रुवारी : अभिनेत्री प्रियांका चोप्राने आसाम टुरिझमसाठी केलेलं कॅलेंडर वादात सापडलं आहे. या कॅलेंडरवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. आसाम टुरिझमच्या प्रमोशनसाठी हे खास कॅलेंडर तयार करण्यात आलं होतं. मात्र या फोटोमध्ये प्रियांकाने पारंपारिक मेखेला चादर घालण्याऐवजी ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस म्हणजे आसामच्या संस्कृतीचं प्रतीक नसल्यामुळे काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहेत.

रुपज्योती कुर्मी, रोजलीन टिर्की आणि नंदिता दास या आमदारांनी प्रियांकाला आसाम टुरिझमच्या ब्रँड अँबेसिडर पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र अंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटर्सकडे पाठवण्यासाठी हे कॅलेंडर तयार करण्यात आल्याने त्यावर छापलेला फोटो योग्यच असल्याचा दावा भाजपने केला आहे.

त्यामुळे आता प्रियांता या सगळ्या वादाला कसं समोरं जातेय तेच पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: February 21, 2018, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading