लग्नानंतर प्रियांका आपलं नाव ' हे ' ठेवणार आहे

दीपवीरनंतर आता फॅन्सचं लक्ष प्रियांका-निकच्या लग्नाकडे लागलंय. दोघांच्या लग्नाच्या एकेक बातम्या बाहेर यायला लागल्यात. लग्नानंतर प्रियांका आपलं नाव काय ठेवणार याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 11:20 AM IST

लग्नानंतर प्रियांका आपलं नाव ' हे ' ठेवणार आहे

मुंबई, 27 नोव्हेंबर : दीपवीरनंतर आता फॅन्सचं लक्ष प्रियांका-निकच्या लग्नाकडे लागलंय. दोघांच्या लग्नाच्या एकेक बातम्या बाहेर यायला लागल्यात. लग्नानंतर प्रियांका आपलं नाव काय ठेवणार याचीही अनेकांना उत्सुकता आहे.


आमच्या सूत्रांनी याची माहिती काढलीय. प्रियांका लग्नानंतर निकचं नाव लावणार आहे. त्यामुळे तिचं नाव आता प्रियांका निक जोनस असं होईल.

काही दिवसांपूर्वी ती द स्काय इज पिंक सिनेमाचं शूटिंग करत होती. शूटिंगच्या सेटवर तिच्या लग्नाचं जोरदार सेलिब्रेशन झालं.या सेलिब्रेशनसाठी निकही उपस्थित होता. सिनेमाच्या टीमनं दोघांसाठी मोठा केक आणला होता. तो कापून सगळ्यांनी एकच धमाल केली.

जोधपूरचा किल्ला या लग्नासाठी सजवला जातोय.या लग्नात अगोदर कुणी फोटोग्राफर्सनी फोटोज काढू नयेत म्हणून एक चांगली शक्कल लढवलीय. लग्नात वधू-वर हेलिकाॅप्टरनं एन्ट्री करणार आहेत. त्यासाठी प्रियांका पहिल्यांदा मुंबईहून उदयपूरला जाणार. तिथून उम्मेद भवन पॅलेसमधून हेलिकाॅप्टरनं जोधपूरला लग्नाच्या ठिकाणी उतरणार.

Loading...

29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत हेलिकाॅप्टर बुक केलं आहे. 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनं तर 3 डिसेंबरला ख्रिशन पद्धतीनं लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी मधू चोप्रा आधीच जोधपूरला गेल्यात.

हिंदू आणि ख्रिश्चन रीतिरिवाजामध्ये हे दोघे लग्न करणार आहेत. यात संगीत, लग्न आणि रिसेप्शन असे तीन कार्यक्रम असणार आहेत. या शाही जोडप्याचा विवाह मेहरानगड किल्ल्यावर होणार आहे.

मेहरानगड हा महाल या दोघांच्या विवाहासाठी सजवण्यात येणार आहे. हा महालाची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल. तब्बल 60 हजार डॉलर म्हणजेच 43 लाख रुपयांना हा महाल बुक करण्यात आला आहे. राजा उम्मैद सिंह यांचा बनवलेला हा महाल आहे. आता हा ताज हॉटेलच्या मालकीचा आहे.


Videos : संग्राम समेळनं काठीनं झोडपलं गुंडांना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...