प्रियांका चोप्राच्या भावानं तिसऱ्यांदा उरकला साखरपुडा? याआधी 2 वेळा मोडलं आहे लग्न

प्रियांका चोप्राच्या भावानं तिसऱ्यांदा उरकला साखरपुडा? याआधी 2 वेळा मोडलं आहे लग्न

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रानं त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी नुकताच साखरपुडा उरकल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 08 मार्च : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रेटींच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. यंदाच्या वर्षात अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. पण यासोबत आणखी एका सेलिब्रेटीची यात भर पडली आहे ती म्हणजे प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याची. सिद्धार्थनं त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी नुकताच साखरपुडा उरकल्याचं बोललं जात आहे. ईशा अंबानीच्या होळी पार्टीमध्ये या दोघांनीही एकत्र हजेरी लावल्यानं त्यांनी साखरपुडा केल्याचा अंदाज लावला जात आहे.

प्रियांका चोप्राचा भाऊ आणि त्याची गर्लफ्रेंड नीलम मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कार्यक्रमांना एकत्र दिसत आहेत. त्यामुळे या दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं बोललं जात आहे. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही ऑफिशिअल घोषणा केलेली नाही. पण आता नीलमनं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. निलमनं या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगितलं आहे.

जीन्सवर साडी हा काय प्रकार, प्रार्थना बेहरेचं हे हटके फोटोशूट पाहिलं का?

निलम उपाध्यायनं स्पॉटबॉय-ईला दिलेल्या मुलाखतीत तिच्या बोटात असलेल्या अंगठीबद्दलही स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, आमच्या बद्दल ज्या प्रकारे चर्चा सुरू आहेत असं काहीही नाही. ही अंगठी माझ्या डाव्या हाताच्या बोटात आहे त्यामुळे हे तर स्पष्टच आहे की आम्ही लग्न केलेलं नाही. आम्ही दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. याआधीही अशा अफवा उठल्या होत्या. लोकांचं कामच असतं अफवा पसरवण्याचं. निलमच्या बोलण्यावरुन हे स्पष्ट होतं की या दोघांचा साखरपुडा झालेला नाही.

सलमाननं शेअर केले आयतसोबतचे खास क्षण, पाहा मामा-भाचीचा हा क्यूट VIDEO

 

View this post on Instagram

 

The pictures may not be of the best quality PARRR BURA NA MAANO HOLI HAI ✨

A post shared by Neelam Upadhyaya (@neelamupadhyaya) on

 

View this post on Instagram

 

Post-brunch happy faces ☕️

A post shared by Neelam Upadhyaya (@neelamupadhyaya) on

प्रियांका चोप्राच्या भावाचा या आधी दोन वेळा साखरपुडा झाला होता. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नानंतर अगदी काही महिन्यातच प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि इशिता कुमार यांचा साखरपुडा झाला होता. मात्र लग्नाला काही दिवस उरलेले असताना दोघांचं लग्न तुटलं. त्याआधीही सिद्धार्थचा साखरपुडा अशाच प्रकारे तुटला होता. त्यामुळे आता नीलम आणि त्याचं हे नातं किती दिवस टिकतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

भारतीय टीमची 'ही' खेळाडू Volleyball सोडून झाली बॉलिवूडची हॉट अभिनेत्री

First published: March 8, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या