लंडन, 08 जानेवारी: बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठमटवणारी प्रियांका चोप्रा लंडनमधील कोरोना लॉकडाऊनमुळे पती निक जोनससोबत अडकून पडली आहे. दरम्यान प्रियांकावर युकेमधील लॉकडाउनचे नियम (Lockdown Rules in UK) मोडल्याचा आरोप झाला आहे. बुधवारी 6 जानेवारी रोजी ती एका सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई डॉ. मधु चोप्रा आणि तिची डॉगी डायना देखील होती. सध्या ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे.
एका वृत्तानुसार, बुधवारी 6 जानेवारी रोजी प्रियांका चोप्रा (Priyanka chopra) सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोश वुड यांच्या सलूनमध्ये गेली होती. यावेळी सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोश वुड हे देखील उपस्थित होते. पण यावेळी प्रियांकाने लॉकडाऊन नियम तोडल्याचा तिच्यावर आरोप आहे. संबंधित प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी सलूनमध्ये जावून प्रियांका चोप्रा आणि जोश वुड यांना कोरोना नियमांची आठवण करून दिली आहे. या उल्लंघनांवर त्यांनी कोणत्याही प्रकारचा दंड आकारला नाही.
Metro.co.uk ने आपल्या एका वृत्तात याप्रकरणी मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या प्रवक्त्यांशी बातचित केली आहे. त्यांनी आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, त्यांना ही माहिती बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे पोलिसांनी या दोघांनाही कोविड 19 लॉकडाउन नियमांचं पालन करण्यासंबंधी रिमाइंडर देण्यात आला आहे. तसेच अन्य स्त्रोतांसाठी स्वाक्षरी घेण्यात आली. सध्या त्यांच्यावर कोणताही निश्चित दंड किंवा नोटीस बजावण्यात आलेली नाही.
ब्रिटनमधील लॉकडाऊन नियमांमुळे प्रियांका सध्या लंडनमध्ये पती निक जोनस अडकल्याची माहिती आहे. 'टेक्स्ट फॉर यू' या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनमध्ये होती. परंतु लंडनमध्ये अचानक कोरोना लॉकडाउन जाहीर झाला आहे. सोमवारी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी यूकेमध्ये लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, देशात पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाउन जाहीर केला जाईल. या नियमांचं उल्लंघन करणार्यांना 10000 पाउंड एवढा दंड होऊ शकतो. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम तब्बल 10 लाख रुपयांच्या जवळपास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown