News18 Lokmat

'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग

प्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती दुसरा बाॅलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2018 12:23 PM IST

'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग

मुंबई, 08 आॅगस्ट : प्रियांका चोप्रानं भारत सोडला. त्याची बरीच कारणं पुढे आली. कोण म्हणालं तिला हाॅलिवूडचा मोठा सिनेमा मिळाला, कोण म्हणालं निकबरोबर तिचं लग्न आहे. सलमाननं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, तिला मोठा सिनेमा मिळालाय, असं ऐकलंय. पण प्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती दुसरा बाॅलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.

प्रियांका सध्या शोनाली बोसचा स्काय इज पिंक हा सिनेमा करतेय. आयशा चौधरीवर हा सिनेमा बेतलाय. असाध्य आजार झालेली आयशा ही मोटिव्हेटेड स्पीकर होती. तिच्या आईची भूमिका प्रियांका करतेय, तर वडिलांची भूमिका फरहान अख्तर करतोय. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.  सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला मिळून याची निर्मिती करतायेत.  सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहे तर जुही चतुर्वेदीने संवाद लिहिले आहेत. प्रियांकानं फरहानसोबत शेवटचा सिनेमा 'दिल धडकने दो' केला होता.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

दुसरीकडे निक आणि प्रियांका यांचं प्रेम बहरतंय. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...