प्रियांकानं 'भारत' सोडण्याचं खरं कारण 'हे' आहे

प्रियांकानं 'भारत' सोडण्याचं खरं कारण 'हे' आहे

प्रियांका चोप्रानं भारत सोडला. का तर तिला लग्न करायचंय निकशी. तिच्या वाढदिवसाला तिनं साखरपुडा केला. अशा बातम्या गेले दोन दिवस व्हायरल होतायत. पण तिनं भारत सोडण्याचं खरं कारण हे नाहीच मुळी!

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : प्रियांका चोप्रानं भारत सोडला. का तर तिला लग्न करायचंय निकशी. तिच्या वाढदिवसाला तिनं साखरपुडा केला. अशा बातम्या गेले दोन दिवस व्हायरल होतायत. पण तिनं भारत सोडण्याचं खरं कारण हे नाहीच मुळी! खरं तर खूप वर्षांनी सलमान-प्रियांका एकत्र येणार होते. पुन्हा सलमानचा सिनेमा म्हटला की तो बाॅक्स आॅफिसवर 100 कोटींच्या पुढे जाणार. हाॅलिवूडमध्ये यश मिळवलं असलं तरी भारतीय फॅन्ससाठी प्रियांकनं बाॅलिवूडमध्ये काम करणं गरजेचं होतं. मग तरीही तिनं हा सिनेमा का सोडला? आमच्या सूत्रांनी दिलेली माहिती पूर्ण वेगळी आहे.

प्रियांका चोप्राने निक जोन्सशी लग्न करायचं म्हणून भारत हा सिनेमा सोडल्याची चर्चा एकीकडे असतानाच दुसरीकडे मात्र एक वेगळंच गुपित समोर येतंय. प्रियांका चोप्राने भारत हा सिनेमा सोडण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिला भीती वाटली की भारत या सिनेमाची अवस्थासुद्धा रेस-3 सारखी होईल. रेस-3 मध्ये जॅकलीनऐवजी डेसी शाह, बॉबी देओल आणि साकिब सालेम या मल्टिस्टार्समुळे जॅकलीनचं पारडं कमी झालं. तर इथे प्रियांका चोप्रासोबत दिशा पटानी, तब्बू या अभिनेत्रीसुद्धा भारतमध्ये असणार हे कळताच प्रियांका चोप्राचा पारा चढला आणि तिच्या भूमिकेचं महत्त्व कमी होणार असं तिला लक्षात आलं. हे कळताच प्रियांकाने सिनेमातून काढता पाय घेणं पसंत केलं. पण कारण मात्र निक जोन्सचं दिलं अशी चर्चा बी टाऊनमध्ये रंगतेय. काय खरं, काय खोटं हे लवकरच कळेल. सो वेट अॅण्ड वॉच.

खरं तर प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 09:48 AM IST

ताज्या बातम्या