VIDEO : गंभीर आरोप करत ओरडणाऱ्या पाकिस्तानी तरुणीला प्रियांका चोप्राचं सडेतोड उत्तर!

VIDEO : गंभीर आरोप करत ओरडणाऱ्या पाकिस्तानी तरुणीला प्रियांका चोप्राचं सडेतोड उत्तर!

एका पाकिस्तानी मुलीनं एका इव्हेंटमध्ये प्रियांकावर गंभीर आरोप केले होते. मात्र हे प्रकरण प्रियांकानं व्यवस्थित हाताळलं.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : स्टार असणं अनेकदा सेलिब्रेटीसाठी डोकेदुखी ठरतं. मात्र अनेक स्टार्सना या अशा समस्यांना सामोरं कसं जायचं हे चांगलंच माहित असतं. अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत काहीसं असंच घडलं. प्रियांकासमोर ओरडून ओरडून गंभीर आरोप करणाऱ्या एका मुलीला प्रियांकानं सडेतोड उत्तर देत गप्प केलं. प्रियांकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका पाकिस्तानी मुलीनं एका इव्हेंटमध्ये प्रियांकावर गंभीर आरोप केले होते मात्र हे संपूर्ण प्रकरण प्रियांकानं व्यवस्थित सांभाळलं. या मुलीला प्रेमानं समजावत कडक शब्दात तिला गप्प राहण्याचा सल्लाही दिला.

VIDEO: तरुणीने गर्दीत खेचला सलमानचा हात, चाहते म्हणाले थोबाडीत मार!

प्रियांका चोप्रानं शनिवारी 10 ऑगस्टला ब्यूटीकॉल लॉस एंजेलिसला हजेरी लावली. त्यावेळी तिनं चाहत्यांशीही संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. या इव्हेंटमध्ये प्रियांकाला प्रश्न विचारत असताना अक पाकिस्तानी मुलगी अक्षरशः भडकलेली दिसली. या मुलीनं प्रियांकाच्या मार्चमधील एका ट्वीटची संदर्भ देत तिच्यावर गंभीर आरोप केले. या ट्वीटमध्ये प्रियांकानं भारतीय सेनेला सलाम करत त्यांचं कौतुक केलं होतं. यावर त्या मुलीचं म्हणणं होतं की, प्रियांका यूनाइटेड नेशन्स गुडविल अॅम्बेसिडर असूनही तिनं अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर वॉरला खतपाणी घातलं आहे.

...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, विद्या बालनची प्रतिक्रिया

या मुलीनं म्हटलं, 'तू जगात शांतता राहावी म्हणून यूनाइटेड नेशन्स की गुडविल अॅम्बेसडर आहेस. तू कोणत्याही प्रकारे यामध्ये सहभागी व्हायला नको होतं.' या मुलीच्या मते, एक पाकिस्तानी असून मी आणि माझ्यासारखे अनेक लोक तुझे चाहते आहेत. त्यांनी तुला तुझ्या बिझनेसमध्येही आपापल्या परीनं तुला पाठिंबा दिला आहे. प्रियांकानं तिच्या ट्वीमध्ये फक्त, 'जय हिंद (भारत अमर रहे)IndianArmedForces' एवढंच लिहिलं होतं.

Saaho Trailer : सुपरस्टार प्रभासचा हॉलिवूडपेक्षाही जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार!

प्रियांकानं या मुलीचं पूर्ण बोलणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर तिनं त्या मुलीला प्रेमानं समजावलं. ती म्हणली, माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत आणि मी भारतीय आहे. मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्यांची माफी मागते. मला वाटतं आपल्या सर्वांकडेच एक मिडिल ग्राउंड असतं, ज्यावर आपण सर्वांनी चालायला हवं. यानंतर प्रियांकानं त्या मुलीला म्हटलं, तु माझ्याशी ओरडून बोलत आहेत ज्याची काहीच गरज नाही. आपण इथं प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत. प्रियांकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तिचे चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.

==============================================================================

पुरातून वाचवताना निसटला आणि झाडाला अडकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 04:38 PM IST

ताज्या बातम्या