मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अनेक वर्षांनंतर समोरासमोर आले शाहरुख आणि प्रियांका; चाहत्यांना आठवला 'तो' किस्सा

अनेक वर्षांनंतर समोरासमोर आले शाहरुख आणि प्रियांका; चाहत्यांना आठवला 'तो' किस्सा

शाहरुख खान-प्रियांका चोप्रा

शाहरुख खान-प्रियांका चोप्रा

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा अनेक वर्षांनंतर एकत्र दिसले आहेत. आता एवढ्या वर्षांनंतर त्यांना समोरासमोर आलेलं पाहून चाहत्यांना त्यांच्याबद्दल एक जुना किस्सा आठवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 02 डिसेंबर :  बॉलीवूडचं जगात नेहमी काही ना काही शिजत असतं. कलाकारांमधील अफेअर, लग्न अशा चर्चांना नेहमी उधाण येतं. अशीच चर्चा  बॉलिवूडचा  किंग खान शाहरुख आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा यांना  एकत्र पाहिल्यानंतर सुरु झाली आहे. चर्चा करायचं कारण म्हणजे अनेक वर्षानंतर हे दोघे समोरासमोर आले आहेत.  या दोघांतील आतापर्यंत संबंध नक्कीच चांगले राहिले नाहीत आणि यामुळेच ते कधीच एकत्र दिसले नाहीत. अनेक वर्षांपासून दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असून अनेक वर्षात एकत्र दिसलेले नाहीत. त्यामुळे आता एवढ्या वर्षांनंतर त्यांना समोरासमोर आलेलं पाहून चाहत्यांना त्यांच्याबद्दल एक जुना किस्सा आठवला आहे.

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा अनेक वर्षांनंतर एका कार्यक्रमात सोबत दिसले आहेत. प्रियांका आणि शाहरुख नुकतेच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयोजित रेड सी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. आता चर्चा होण्याचं कारण म्हणजे एकेकाळी शाहरुख आणि प्रियांका यांच्यातील नाते चर्चेत होते.  तेव्हा हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा - Shahrukh Khan: पठाणच्या प्रदर्शनाआधी शाहरुखने दिली मक्का मशिदिला भेट; प्रार्थना करतानाचे PHOTO व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटादरम्यान डेट करायला सुरुवात केली होती. प्रियंका आणि शाहरुख खान अनेकदा रात्री उशिरा एकत्र दिसले होते. एवढंच नाही तर या २०१३ मध्ये या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.   पण शाहरुखने प्रियांका चोप्रासोबतच्या अफेअरबद्दल 'आम्ही चांगले मित्र आहोत' म्हणत या चर्चाना पूर्णविराम दिला होता.

या दोघांनी  अफेअरबद्दल उघडपणे बोलले नेहमीच टाळले. पण शाहरुख खान अनेकदा प्रियंका चोप्राला त्याच्या घरी पार्ट्यांमध्ये आमंत्रित करत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने करण जोहरच्या घरी आयोजित पार्टीत प्रियांका चोप्राला जबरदस्तीने आमंत्रित केले होते. याच पार्टीत  शाहरुख तिला  रिसीव्ह करायलाही गेला होता आणि ती येताच शाहरुखने तिच्या गालावर एक किस देखील केले होते. ज्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार, गौरी खानला शाहरुख खान आणि प्रियांकाचे इतके जवळ असणे पसंत नव्हते.

याच कारणामुळे काही काळानंतर त्यांच्यात दुरावा आला होता. 'डॉन 2' मध्ये एकत्र काम केल्यानंतर या दोघांनी एकही चित्रपट एकत्र केला नाही आणि 2013 नंतर दोघांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे बंद केले. आता दोघांनाही अशा प्रकारे एकत्र पाहिल्यावर  प्रियांका आणि शाहरुखमधील दरी दूर झाल्याचं चाहते म्हणत आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Priyanka chopra, Shahrukh khan