मुंबई, 27 नोव्हेंबर : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस येत्या 1 डिसेंबरला लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. पण लग्नाच्या वाढदिवसाआधीच प्रियांकानं निक जोनसला स्पेशल गिफ्ट देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रियांकानं निकला असं खास गिफ्ट दिलं आहे की जे पाहिल्यावर निक खूपच खूश झाला आहे. प्रियांकाच्या या गिफ्टनंतर जोनस फॅमिलीमध्ये एक नवा सदस्य सामील झाला आहे. ज्याचं नाव आहे जीनो जोनस.
जीनो जोनस हे एका कुत्र्याच्या पिल्लाचं नाव आहे. हे पिल्लू प्रियांकानं निकला अॅनीवर्सरीच्या आधीच गिफ्ट म्हणून दिलं आहे. प्रियांका आणि निकनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जीनोचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात जीनो पहिल्याच बाबा निक जोनसला भेटताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये निक झोपलेला असून त्याला प्रियांका त्याला उठवताना दिसत आहे. त्यानंतर जीनो बेडवर चढतो आणि त्याला उठवतो. सुरुवातीला निकला काहीच समजत नाही. नंतर मात्र त्याच्या लक्षात येतं की हे किती छान सरप्राइज आहे.
सलमान खानचा ‘दबंग 3’ अडकला वादात, हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप
निक आणि प्रियांकाला प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच जीनोला त्यांनी आपला मुलगा मानलं आहे. याआधी प्रियांकाकडे डायना नावाची कुत्री आहे. जिच्यावर तिचं खूप प्रेम आहे. प्रियांकानं डायनाच्या नावानं इन्स्टाग्रामवर अकाउंटही सुरु केलं आहे. प्रियांकानं तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये हे स्पष्ट केलं आहे की, भले जीनो तिच्या लाइफमध्ये आला असला तरीही ती आताही डायनावर खूप प्रेम करते.
मालिकेत बहीण-भाऊ, खऱ्या आयुष्यात मात्र करतायेत एकमेकांना डेट
View this post on Instagram
प्रियांका आणि निक मागच्या वर्षी 1 डिसेंबरला जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीनं लग्न केलं. सध्या प्रियांका तिची आगामी वेब सीरिज ‘द व्हाइट टायगर’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या वेब सीरिजचं शूटिंग मुंबई आणि दिल्लीमध्ये होत आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईमध्ये काही पार्ट्यांमध्येही दिसली.
बॉलिवूडचे हे कलाकार सेरोगसीच्या मदतीनं झाले आई-बाबा!
==============================================================================