VIDEO : प्रियांका-निकच्या लग्नाच्या शानदार आतषबाजीनं डोळे दिपतील

VIDEO : प्रियांका-निकच्या लग्नाच्या शानदार आतषबाजीनं डोळे दिपतील

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं जोधपूरच्या उमेद पॅलेसमध्ये निवडक मित्र आणि नातेवाईकांच्या साक्षीनं लग्न झालं. ख्रिश्चन पद्धतीनं लागलेल्या या लग्नाचा अद्याप एकही फोटो मीडियापर्यंत पोहोचलेला नाही. पण लग्नघरातली आतषबाजी मात्र दुरूनही दिसते आहे.

  • Share this:

जोधपूर, १ डिसेंबर : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघे जोधपूरच्या उमेद पॅलेसमध्ये निवडक मित्र आणि नातेवाईकांच्या साक्षीनं एकमेकांचे झाले. ख्रिश्चन पद्धतीनं लागलेल्या या लग्नाचा अद्याप एकही फोटो मीडियापर्यंत पोहोचलेला नाही. पण लग्नघरातली आतषबाजी मात्र दुरूनही दिसते आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं शुभमंगल ख्रिश्चन पद्धतीनं राजस्थानच्या जोधपूरमध्ये पार पडलं.

जोधपूरच्या उमेद पॅलेसमध्ये शाही थाटात हे लग्न लागलं. ख्रिश्चन पद्धतीनं लग्न लागल्यानंतर आता हिंदू पद्धतीनंही लग्नसमारंभ होईल. प्रियांका आणि निक या शाही लग्नसोहळ्यासाठी जोधपूरला आल्याचे फोटो मीडियापर्यंत पोहोचले पण लग्नाचे फोटो मात्र अद्याप बाहेर आलेले नाहीत. पण लग्न लागल्यानंतर झालेल्या धमाकेदार आतषबाजीचे आणि रोषणाईनं मात्र जोधपूरकरांचे डोळे दिपून गेले आहेत.

 

प्रियांका- निक यांच्या लग्नाचा एकही फोटो नाही दिसणार कारण....

First published: December 1, 2018, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading