प्रियांकाचा VIDEO VIRAL, KISS करताना निकच्या ओठांना लागली लिपस्टिक आणि...

प्रियांकाचा VIDEO VIRAL, KISS करताना निकच्या ओठांना लागली लिपस्टिक आणि...

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही हिट जोडी आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही हिट जोडी आहे. पर्सनल लाइफसोबतच हे दोघंही त्यांचं प्रोफेशनल लाइफ सुद्धा व्यवस्थित सांभाळताना दिसतात. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतीच या कपलनं गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये हजेरी लावली. यावेळचा निकला लिपलॉक किस करतानाचा प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2020 सोहळा अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरातील बेवर्ली हिल्टन हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी प्रियांका पिंक गाऊनमध्ये दिसली. यासोबत तिनं डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स घातले होते. तर ब्लॅक ब्लेझर सुटमध्ये खूपच हॅन्डसम दिसत होता. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात प्रियांका निकला लिपलॉक किस करताना दिसत आहे. पण यावेळी प्रियांकाची लिपस्टिक निकच्या ओठांना लागते. हे पाहिल्यावर प्रियांका सर्वांसमोर आपल्या हातानं ती लिपस्टिक पुसताना दिसते.

Birthday Special : बिपाशा बासूचे 'हे' 30 दुर्मिळ फोटो, तुम्ही कधीच पाहिले नसतील

 

View this post on Instagram

 

AWWWW 😭😍💋#goldenglobes ☆ ☆ ☆ ☆ #Niyanka#niyankaforever#priyankachopra #priyankachoprajonas #nickjonas #priyankaandnick #selfies #magazine #photoshoot #kevinjonas #joejonas #sophieturner #daniellejonas #family #jonasbrothers #nickyanka #prick #hollywood #bollywood #india #actor #actress #singer #tsip #theskyispink #TSIP #missworld #missworld2000

A post shared by Priyanka Chopra Malaysia FC (@priyankachopra.malaysia) on

प्रियांका आणि निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. तसं पाहायला गेलं तर असं करण्याची निक-प्रियांकाची ही पहिलीच वेळ नाही. पण हा व्हिडीओ खूप खास आहे. याआधीही या दोघांच्या एका फॅनपेजवर न्यू ईयरला लिपलॉक किसचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ एका पार्टीतला असल्याचं बोललं जात आहे.

JNU हल्ला निषेध : मुंबईत विशाल भारद्वाजने सादर केली कविता, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे दोघं स्टेजवर एकमेकांना किस करताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल झाला होता. याशिवाय प्रियांकानं एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, नव्या वर्षाची नवी भेट. नव्या वर्षात देवानं त्याच्या खजिन्यात काय ठेवलं आहे याची मला खूप उत्सुकता आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिले त्यांचे आणि देवाचे खूप खूप आभार.

श्रीदेवी यांच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर, खोटे ठरले सर्व दावे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2020 04:23 PM IST

ताज्या बातम्या