प्रियांका-निकच्या लग्नाचा पहिला फोटो काढण्यासाठी मॅगझिन्सची चढाओढ

प्रियांका-निकच्या लग्नाचा पहिला फोटो काढण्यासाठी मॅगझिन्सची चढाओढ

प्रियांका चोप्रा न्यूयाॅर्कहून भारतात परतलीय. निक आणि तिचं 2 डिसेंबरला जोधपूरला लग्न आहे. पण स्टार्सच्या सगळ्या गोष्टीच वेगळ्या असतात.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : प्रियांका चोप्रा न्यूयाॅर्कहून भारतात परतलीय. निक आणि तिचं 2 डिसेंबरला जोधपूरला लग्न आहे. पण स्टार्सच्या सगळ्या गोष्टीच वेगळ्या असतात.


प्रियांका-निकच्या लग्नाचा पहिला फोटो कोण छापणार यासाठी मॅगझिन्सची चढाओढ सुरू आहे. अर्थात, ही मॅगझिन्स आहेत आंतरराष्ट्रीय.पण प्रियांका फोटो छापण्याचे राइट्स कोणाला देणार हे अजून नक्की ठरलेलं नाही. प्रियांका आणि निक दोघंही स्टार्स आहेत. त्यामुळे मार्केटिंग तर जोरदार होणार.


अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक यांचं लग्न अगदी जवळ येऊन ठेपलंय. लग्नाची तयारीही सुरू झालीय. नुकतंच प्रियांकाच्या मैत्रिणींनी अमेरिकेत तिचं ब्रायडल शाॅवरही केलं. ब्रायडल शाॅवर ही अमेरिकन पद्धत. यात वधूच्या मैत्रिणी तिला भेटून लग्नाआधी गिफ्ट्स देतात आणि टिप्सही सांगतात.


प्रियांका आणि निक यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे. आपण निकची निवड का केली हेही प्रियांकानं सांगितलं. ती म्हणाली, निक तिचा आणि तिच्या कामाचा आदर करतो. हेच खूप महत्त्वाचं आहे.


निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.


लग्नसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय. लग्नाला फक्त 200 जण उपस्थित असतील. अगदी जवळचे मित्र,मैत्रिणी,नातलग या लग्नाचे साक्षीदार होतील.


संदीप आणि अबू जानी लग्नाच्या संगीताचा लेहंगा डिझाइन करणार आहेत, तर सब्यासाची लग्नाचा लेहंगा डिझाइन करेल. प्रियांका अमेरिकेला जाण्याआधी सब्यासाचीला भेटली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 07:56 AM IST

ताज्या बातम्या