मुंबई, 6 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस लग्नानंतर वेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले आहेत. अनेकदा अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सुद्धा छापून आल्या मात्र या दोघांनीही या सर्व चर्चा फोल ठरवत नेहमीच एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. हे क्यूट कपल सध्या फ्रान्समध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे आणि सोबतच सर्वांना कपल गोल्ससुद्धा देत आहेत. निक-प्रियांकानं जो आणि सोफीच्या लग्नानंतर त्यांची सुट्टी वाढवून घेतली असून ते सध्या फ्रान्समधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. अशातच आता प्रियांकाचा कुकींग व्हिडीओ समोर आला आहे.
निक जोनसनं त्याच्या इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये प्रियांका जेवण बनवताना दिसत आहे. तर निक तिला यात मदत करताना दिसत आहे. निकनं या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो आणि प्रियांकानं त्यांच्या डेट नाईटसाठी कुकिंग क्लास लावल्याचा खुलासा केला आहे. यामध्ये प्रियांका आणि निक पास्ता आणि सॉस बनवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये निक प्रियांका खूप एंजॉय करताना दिसत आहेत.
वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत प्रियांका तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलली होती. ती म्हणाली, एखादी व्यक्ती तुमचा बॉयफ्रेंड असणं आणि नवरा असणं किती वेगवेगळं आहे हे मला माहित नव्हतं. जेव्हा तुम्ही एकत्र वचन घेता त्यावेळी ती व्यक्ती तुमचं कुटुंब आहे आणि मी हे कुटुंब स्वीकारलं आहे. हे आपसुकच तुमच्या मनात येतं. त्या व्यक्तीच्या प्रति तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्हाला जाणवते. तुम्हाला एकमेकांबद्दल रोज काहीतरी नवं समजत असतं.
हृतिक आणि तापसीनंतर आता दीपिका पदुकोण रंगोली चंडेलच्या निशाण्यावर
प्रियांका चोप्रा लवकरच सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या सिनमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या आधी ती शेवटची बाजूराव मस्तानीमध्ये दिसली होती. ‘द स्काय इज पिंक’मध्ये प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय ती हॉलिवूड स्टार मिडी कलिंगसोबत एक कॉमेडी सिनेमा करत आहे.
एमएस धोनीच्या मुलीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?
======================================================================
SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा