मुंबई, 30 मार्च : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. निक-प्रियांका नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र नुकतीच या दोघांबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
निक आणि प्रियांका लवकरच एकमेकांपासून दूर होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र हे वृत्त कितपत खरं आहे याचा कोणताच ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण प्रियांकाचे चाहते हे वृत्त कुठून आले याच्या शोधात आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार या वृत्ताची सुरूवात एका मासिकातून झाली आहे.
अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या एका मासिकामध्ये निक आणि प्रियांकामध्ये काही अलबेल नसल्याचं वृत्त पहिल्यांदा छापून आलं. या मासिकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये असं म्हटलं आहे की, प्रियांका आणि निकमध्ये सध्या लहान-लहान गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. निक प्रियांकाच्या लग्नाला 4 महिने पूर्ण होत असतानाच या मासिकात छापून आलेल्या बातमीनं त्यांच्या घटस्फोटाची अफवा पसरली आहे.
'ओके' नावाच्या या मासिकानं म्हटलं आहे की, निक आणि प्रियांका लग्नानंतर प्रत्येक लहान गोष्टीवरून भांडत असतात. ते दोघंही एकमेकांसोबत आनंदी नाहीत. मासिकाच्या बातमीनुसार निकच्या मते, त्यानं हे लग्न खूप घाईघाईत केलं आणि लग्नाच्यावेळी त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की, प्रियांका खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकनं प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असं जोनस कुटुंबियांना वाटतं.
मात्र या मासिकानं प्रसिद्ध केलेल्या या वृत्तात कितपत तथ्य आहे हे निक किंवा प्रियांकाच्या प्रतिक्रियेनंतरच कळेल. याअगोदरही निक प्रियांकाच्या लग्नानंतर काही दिवसातच एका अमेरिकन महिला पत्रकाराने प्रियांकावर निक सोबत बळजबरीनं लग्न केल्याचा आरोप केला होता. मात्र जोनस कुटुंबियांनी या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं सांगितल्यावर त्या पत्रकाराला माफी मागावी लागली होती. निक प्रियांका नुकतेच मायामीवरून सुट्टी एंजॉय करून परतले आहेत. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सेशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे या मासिकातील वृत्त हे फक्त अफवा असल्याचा अंदाज लावला जात आहे.