Home /News /entertainment /

'देसी गर्ल' Priyanka chopra लवकरच होणार आई? जवळच्या व्यक्तीने दिली Good News

'देसी गर्ल' Priyanka chopra लवकरच होणार आई? जवळच्या व्यक्तीने दिली Good News

Priyanka chopra Pregnant

Priyanka chopra Pregnant

बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka chopra Pregnant ) लवकरच आई होणार असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे.

  नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka chopra ) नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्यावरुन चर्चेत आहे. तिच्या आणि निक जोनस यांच्या घटोस्फोटाच्या चर्चेनंतर आता प्रियांका प्रेग्नेंट(Priyanka chopra Pregnant ) असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे. तिच्या जवळच्याच व्यक्तीने ही माहिती दिली आहे. प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती निक जोनासचे (Nick Jonas ) आडनाव ( Remove Surname) हटवल्यानंतर तिच्या घटोस्फोटाच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, प्रियांकाने 'आश्चर्यकारक! मला तुझ्या कुशीत मरायचं आहे.' अशी निकच्या एका व्हिडीओला कमेंट करत घटोस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

  प्रियांका चोप्रा प्रेग्नेंट?

  यानंतर आता ती प्रेग्नेंट असल्याची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. पॉप डायरीजच्या रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. लवकरच हे जोडपे पालक होत आहेत. प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचेही सांगितले जात आहे. हे जोडपे आपल्या मुलाबद्दल खूप आनंदी आणि उत्साहित आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. वयाच्या या अंतरावरून त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे, जिथे अनेक चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली आणि अनेकांनी या प्रकरणावर त्याची खिल्ली उडवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अलीकडे 23 नोव्हेंबर रोजी एका रोस्ट शोमध्ये तिने तिच्या आणि निकमधील वयाच्या दहा वर्षांच्या फरकाबद्दल बोलण्याचा आनंद घेतला. प्रियंका हसली आणि म्हणाली की निकच्या सर्व भावांची नावे लक्षात ठेवणे खूप कठीण आहे.

  2018 मध्ये थाटामाटात लग्न केले

  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी भारतातील राजस्थानमधील जोधपूर येथे हिंदू आणि कॅथोलिक रितीरिवाजांनुसार लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. यानंतर प्रियांका भलेही देश सोडून गेली असेल, पण कोणत्याही भारतीय सणात ती सर्वांना तिच्या मूळ रंगात रंगवायला विसरत नाही.अलीकडेच प्रियांकाने पूर्ण भक्तिभावाने दिवाळीची पूजा केली आणि या पूजेत तिच्यासोबत निक जोनासही सहभागी झाला होता. ज्याची जोडी सोशल मीडियावर खूप गाजली.

  तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर...

  प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमधील एका मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा आहे. the matrix resurrections या प्रियंकाच्या नव्या चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशात फिल्ममधला एक टीवी स्पॉट समोर आलाय. त्यात ती डोळा मारताना दिसून येतेय. काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा लूक समोर आल्यानंतरही त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Entertainment, Priyanka chopra

  पुढील बातम्या