पती निक जोनससोबत प्रियांका पोहोचली हॉस्पिटलमध्ये, हे आहे कारण

पती निक जोनससोबत प्रियांका पोहोचली हॉस्पिटलमध्ये, हे आहे कारण

प्रियांका चोप्रा नुकतीच पती निक जोनससोबत हॉस्पिटलमध्ये दिसली.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : ग्लोबल मीडिया स्टार प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका अमेरिकन महिलेनं प्रियांकाचा अपमान केल्याचं दिसून आलं. असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याधीही अमेरिकन प्रसार माध्यमांनी प्रियांकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा अनेक कारणांमुळे प्रियांका सतत चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. नुकताच प्रियांकाचा हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रियांका चोप्रा नुकतीच पती निक जोनससोबत हॉस्पिटलमध्ये दिसली. त्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा झाल्या होत्या मात्र यामागे कारण काही वेगळंच होतं. प्रियांका निकसोबत तिच्या एका चाहतीला भेटायला गेली होती त्यावेळी निकचे भाऊ जो आणि केविन सुद्धा त्यांच्या सोबत होते. ही चाहती जोनास ब्रदर्सच्या हॅप्पीनेस बिगिन्स कॉन्सर्टला पोहचू शकली नव्हती त्यामुळे जोनास ब्रदर्सनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची भेट घेतली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

22 लाखांना विकलं 1995 च्या चित्रपटाचं पोस्टर, काय आहे खास?

 

View this post on Instagram

 

Jonas Brothers visit a fan in the hospital who was supposed to be at their show tonight. This is so sweet @ljsworkinprogress #priyankachopra #nickjonas #joejonas #kevin #jonasbrothers

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

या व्हिडीओमध्ये प्रियांका बेडवर झोपलेल्या या चाहतीशी हात मिळवते. त्यानंतर ती मागे जाऊन उभी राहते. निक जोनास आणि प्रियांकाला पाहून ही चाहती खूपच उत्साहित झालेली पाहायला मिळते. त्यानंतर जोनास ब्रदर्सनी या चाहतीसोबत सेल्फीसुद्धा घेतला.

अक्षय कुमारला भेटण्यासाठी 18 दिवसांत तो चालला 900 किलोमीटरचं अंतर!

काही दिवसांपूर्वी प्रियांकानं अभिनेता अनुपम खेर यांना निकच्या इव्हेंटमध्ये निमंत्रित केलं होतं. त्यानंतर या इव्हेंटमधील व्हिडीओ अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं, ‘मला या इव्हेंटमध्ये निमंत्रीत करण्यासाठी धन्यवाद प्रियांका. मी खूप एंजॉय केलं. जोनास ब्रदर्स खुपच चांगले परफॉर्मर्स आहेत.’ प्रियांका चोप्रा लवकरच ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

VIRAL VIDEO : ... आणि सर्वांसमोर अनन्या पांडेवर भडकला कार्तिक आर्यन

======================================================================

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 11:58 AM IST

ताज्या बातम्या