प्रियांका चोप्राच्या स्कर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल!

प्रियांका चोप्राच्या स्कर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल!

प्रियांकाचा हा फोटो व्हायरल झालाय. त्यात तिनं एक स्वेटर घातलाय. त्याखाली लाल रंगाचा स्कर्ट आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लग्नाची चर्चा सध्या भरपूर आहे. पण लग्नाशिवाय अजून एका गोष्टीसाठी ती प्रचंड चर्चेत आहे. तिनं तिचा हा नवा पोशाख घातलेला फोटो पोस्टही केलाय.


प्रियांकाचा हा फोटो व्हायरल झालाय. त्यात तिनं एक स्वेटर घातलाय. त्याखाली लाल रंगाचा स्कर्ट आहे. तो लेदरचा आहे, असं म्हटलं जातंय. त्याची किंमत पाहून तुम्हाला धक्काच बसेल.


या अख्ख्या ड्रेसची किंमत आहे 2 लाख रुपये. त्यात फक्त स्कर्टची किंमत आहे फक्त दीड लाख. अर्थात, प्रियांका याहूनही महागडे ड्रेस घालतेच. पण सध्या याची चर्चा खूप आहे.
2 डिसेंबरला प्रियांकाचं लग्न आहे आणि तिची तयारी सुरू झालीय. आधी संदीप खोसला आणि अबू जानी प्रियांकासाठी ड्रेस डिझाईन करणार अशी बातमी होती. आता त्यात सब्यासाचीचंही नाव जोडलं गेलंय. स्पाॅटबाॅयच्या माहितीनुसार संदीप आणि अबू जानी लग्नाच्या संगीताचा लेहंगा डिझाइन करणार आहेत, तर सब्यासाची लग्नाचा लेहंगा डिझाइन करेल. प्रियांका अमेरिकेला जाण्याआधी सब्यासाचीला भेटली होती.


हा लग्नसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय. लग्नाला फक्त 200 जण उपस्थित असतील. अगदी जवळचे मित्र,मैत्रिणी,नातलग या लग्नाचे साक्षीदार होतील.


प्रियांका आणि निक यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे. आपण निकची निवड का केली हेही प्रियांकानं सांगितलं. ती म्हणाली, निक तिचा आणि तिच्या कामाचा आदर करतो. हेच खूप महत्त्वाचं आहे.


निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 01:55 PM IST

ताज्या बातम्या