Elec-widget

प्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला!

प्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला!

प्रियांका चोप्रा-निक जोनस ही जोडी लग्न झाल्यानंतर पहिल्या हनिमूनसाठी ओमानला गेली होती. पण लगेचच ते परत आले. आता ते दुसऱ्या हनिमूनला या रोमँटिक ठिकाणी जाणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : बाॅलिवूडची लग्नं खूप गाजली. दीपवीरचं लग्न झाल्यानंतर प्रियांका आणि निकच्या लग्नाचे सोहळेही खूप रंगले. दीपवीर सिंबा सिनेमामुळे हनिमूनला जाऊ शकते नाहीत. पण चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. तो म्हणजे, प्रियांका- निक हनिमून कुठे जाणार?

तर बातमी अशी आहे की, प्रियांका चोप्रा-निक जोनस ही जोडी लग्न झाल्यानंतर पहिल्या हनिमूनसाठी ओमानला गेली होती. पण लगेचच ते परत आले. कारण ईशा अंबानीच्या लग्नाचं त्यांनाही निमंत्रण होतं.

आता ही जोडी दुसऱ्या हनिमूनसाठी जाणार आहे एका एक्झॉटिक ठिकाणी. आणि ते ठिकाण म्हणजे बॉलिवूडला सर्वाधिक आवडणारं ठिकाण आहे.अर्थातच, स्वित्झर्लंड! प्रियांका-निक दुसऱ्या हनिमूनसाठी स्वीसला रवाना होतील 28 डिसेंबरला.तिथेच नव्या वर्षाचं स्वागत करून ही जोडी 12 दिवसांनी परत येईल अशी चर्चा आहे.

याआधी मुंबईत 19 आणि 20 डिसेंबरला लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे. 19 डिसेंबरच्या पार्टीत सिनेक्षेत्राबाहेरच्या बाहेरच्या व्यक्तींना आमंत्रण केलं जाणार आहे. तर 20 डिसेंबरला बाॅलिवूड लोटणार आहे.

लग्नानंतर प्रियांका चोप्राचं रूपच पालटलं. ती आता पूर्ण वेगळी दिसतेय. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर आहे. ती अगदी नववधूसारखी दिसतेय. आधुनिक विचार आणि आचार असलेली प्रियांका आता बदलली म्हणून ट्विटरवर तिच्यावर टीका सुरू झाली.

Loading...

एका युजरनं ट्विट करून लिहिलं, जोरजोरात आरडाओरड करून म्हणायचं मला पुरुषाची गरज नाही. पुरुषांची गरज मुलांसाठी असते. अचानक तुम्हाला तुमचा पुरुष मिळाला की त्याला चंद्र, सूर्याची नावं द्यायची. भांगात सिंदूर लावायचा.'

ही टीका प्रियांकाची आई मधू चोप्राला काही आवडली नाहीय. तिनं यावर लिहिलं, ' सिंदूर काही बंधन नव्हे. प्रियांकानं ते नेहमीच्या आयुष्यात सिद्ध केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2018 07:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...