मुंबई, 10 डिसेंबर: देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanaka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) हे हॉलिवूडमधील फेव्हरेट कपल. प्रियांका आणि निक यांची केमिस्ट्री चाहत्यांना फारच आवडते. आता हीच केमिस्ट्री चाहत्यांना ऑनस्क्रीन बघायला मिळणार आहे. कारण टेक्स फॉर यू (Text For You) या हॉलिवूडपटात प्रियांका आणि निक एकमेकांसोबत काम करताना दिसणार आहेत. टेक्स फॉर यू हा चित्रपट रोमँटिक ड्रामा असणार आहे. देसी गर्ल आणि तिच्या नवऱ्याला एकत्र पडद्यावर बघायला मिळणार यामुळे भारतामधील चाहतेही आनंदी झाले आहेत.
टेक्स फॉर यूचं शूटिंग सुरू झालं आहे. शूटिंग करत असताना प्रियांका निकला चक्क कारमधून खाली उतरवते आणि त्याला अनेक अपशब्दही बोलते. असा सीन होता. हा सीन शूट करताना प्रियांका आणि निकने खूप मजामस्ती केली. जीम स्ट्रॉसे या प्रसिद्ध लेखकाने चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या लंडनमध्ये होत आहे.
निकच्या भूमिकेविषयी प्रियांका किंवा निककडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रियांका आणि निकच्या लग्नाला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली. सुरुवातीला त्यांना बराच विरोध सहन करावा लागला होता. वयातील अंतरामुळे त्यांना भारतातील अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका आणि निकने एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
आपली देसी गर्ल बॉलिवूडमध्ये कधी दिसणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला अगदी थोडेच दिवस वाट पाहावी लागणार आहे. राजकुमार राव सोबतच्या एका चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा लवकरच झळकणार आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियांकाचं करिअर सध्या सुस्साट सुरू आहे.