प्रियांकाच्या सिंदूरवर झालेल्या टीकेला आईनंच दिलं हे उत्तर

प्रियांकाच्या सिंदूरवर झालेल्या टीकेला आईनंच दिलं हे उत्तर

लग्नानंतर प्रियांका चोप्राचं रूपच पालटलं. ती आता पूर्ण वेगळी दिसतेय. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : लग्नानंतर प्रियांका चोप्राचं रूपच पालटलं. ती आता पूर्ण वेगळी दिसतेय. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर आहे. ती अगदी नववधूसारखी दिसतेय. आधुनिक विचार आणि आचार असलेली प्रियांका आता बदलली म्हणून ट्विटरवर तिच्यावर टीका सुरू झाली.

एका युजरनं ट्विट करून लिहिलं, जोरजोरात आरडाओरड करून म्हणायचं मला पुरुषाची गरज नाही. पुरुषांची गरज मुलांसाठी असते. अचानक तुम्हाला तुमचा पुरुष मिळाला की त्याला चंद्र, सूर्याची नावं द्यायची. भांगात सिंदूर लावायचा.'

ही टीका प्रियांकाची आई मधू चोप्राला काही आवडली नाहीय. तिनं यावर लिहिलं, ' सिंदूर काही बंधन नव्हे. प्रियांकानं ते नेहमीच्या आयुष्यात सिद्ध केलंय.

प्रियांका-निकचं लग्न जोधपूरला दणक्यात झालं. दिल्लीत त्यांनी रिसेप्शन केलं. आता मुंबईतही रिसेप्शन होणार आहे. ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीनं हे लग्न झालं. लग्नाचा सोहळा चांगलाच रंगला. आता बातमी अशी आहे की, मुंबईत दोन रिसेप्शन्स होणार आहेत.पहिली पार्टी होणार आहे 19 डिसेंबरला, तर दुसरी पार्टी होणार 20 डिसेंबरला.

First published: December 14, 2018, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading