मुंबई, 25 नोव्हेंबर: शाळेच्या कपड्यांमध्ये डोळा मारुन आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरिअर (Priya Prakash Varrier) आठवतेय? तिच्या त्या एक्सप्रेशन्समुळे देशातले हजारो लोक घायाळ झाले होते. आता प्रियाचा आणखी एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया ‘चन्ना मेरेया’ हे हिंदी गाणं गाताना दिसत आहे. लाल साडीमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे. एका लग्नामध्ये प्रिया हे गाणं म्हणताना दिसत आहे.
प्रियाचा मधूर आवाज
अभिनेत्री प्रिया प्रकाशचे एक्स्प्रेशन्स जसे सुंदर आहेत तसाच तिचा आवाजही तेवढाच कमाल आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया अकाऊंड केलं होतं डिलीट
2018 मध्ये प्रियाच्या 'ओरु अदार लव्ह' या सिनेमातील एका गाण्यामुळे तिला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. प्रिया सोशल मीडियावरही फारच सक्रीय होती. त्यावेळी वर्षी तिच्यावर अनेक मीम्सही बनले होते. त्यामुळे प्रियाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डीलिट केलं होतं. 'ओरु अदार लव्ह' या मल्याळम चित्रपटातून प्रियाने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं होतं. प्रिया ‘श्रीदेवी बंगलो’,‘लव हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.