VIDEO प्रिया प्रकाश वॉरियरने पुन्हा मारला डोळा; दीपिकाच्या चॅलेंजला दिलं असं उत्तर

VIDEO प्रिया प्रकाश वॉरियरने पुन्हा मारला डोळा; दीपिकाच्या चॅलेंजला दिलं असं उत्तर

2019 च्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला प्रिया प्रकाशने (Priya Prakash) पुन्हा एकदा आपली आयकॉनिक स्टाईल तयार केली आणि हा मजेदार व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 1 जानेवारी : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या 'छपाक' dpisms  असं लिहून तिने instagram वर काही व्हिडिओ शेअर केलेत. त्यापैकी एकात तिने अगदी प्रिया वॉरियरसारखा डोळा मारला आणि प्रियाला आव्हान दिलं. त्याचं उत्तर आता प्रिया वॉरिअरने एक व्हिडिओ शेअर करून दिलं आहे.

2018 मध्ये प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Varrier) हे नाव वादळासारखं सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आणि चर्चेत होतं. पुन्हा एकदा असाच जलवा घेऊन प्रिया वॉरियर चाहत्यांच्या भेटीला आली आहे. प्रियाचा एक लक्षवेधी व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ती पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकप्रिय झाली. 2019 च्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला प्रिया प्रकाशने (Priya Prakash) पुन्हा एकदा आपली आयकॉनिक स्टाईल तयार केली आणि हा मजेदार व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

हा फक्त एकच व्हिडिओ नाही तर प्रिया प्रकाश वॉरियरचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) प्रिया प्रकाशला तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चॅलेंज दिले होते. तिच्या आगामी ‘छपाक’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोणने प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Varrier) च्या स्टाईलमध्ये दिसली. हा व्हिडिओ दीपिकाच्या #dpism चा तिसरा भाग होता. प्रिया प्रकाशनेही या व्हिडिओला हार्ट इमो देऊन आपली प्रतिक्रिया दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Prakash Varrier💫 (@priya.p.varrier) on

मल्याळम चित्रपट 'ओरू अदार लव' (Oru Adaar Love)' रिलीज होण्यापूर्वी प्रिया प्रकाश वॉरियरचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा तिचा पहिला चित्रपट होता, परंतु 26-सेकंदाच्या या व्हिडिओने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ती इंटरनेट क्वीन बनली. 'मणिक्य मल्लाराया पूवी' गाण्याच्या व्हिडिओतील तिच्या डोळ्यांच्या हावभावामुळे संपूर्ण देश तिचा चाहता झाला.

 

View this post on Instagram

 

Episode 3 of #dpisms !!!😉 @priya.p.varrier #chhapaak #10thjanuary

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Published by: Renuka Dhaybar
First published: December 31, 2019, 7:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading