'या' अभिनेत्यासोबत प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री!

'या' अभिनेत्यासोबत प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री!

आपल्या नजरेच्या इशाऱ्याने सगळ्यांवर जादू करणारी आणि सोशल मीडियावर सगळ्यांची आवडती प्रिया वारियर आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे.

  • Share this:

12 मार्च : आपल्या नजरेच्या इशाऱ्याने सगळ्यांवर जादू करणारी आणि सोशल मीडियावर सगळ्यांची आवडती प्रिया वारियर आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. अर्थात तिचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण प्रिया तिच्या आवडत्या अभिनेत्यासोबत म्हणजेच चॉकलेट बॉय रणवीर सिंगसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

प्रिया रणवीर सिंगच्या आगमी सिंबा या सिनेमात झळकणार असल्याची माहिती सिनेनिर्माते करण जोहर याने एका मुलाखतीत दिली आहे. त्यात तो म्हणाला की, 'प्रिया फक्त तिच्या डोळ्यांच्या नजाकतीनेच स्टार झाली. सगळ्यांवरच तिने भूरळ पाडली. अनेक अभिनेत्र्यांना तिने मागे पाडलं त्यामुळे तिच्या अभिनयाची बॉलिवूडलाही उत्सुकता आहे.'

मला रणवीर सिंगसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं प्रियाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जर असं असेल तर तिच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असणार आहे. त्यात तिला रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगसारख्या मोठ्या कलाकारांसोबतही काम करण्याची संधीही मिळेल.

खरं तर प्रियाच्या अभिनयामुळे आणि तिच्या यशामुळे तिला बॉलिवूडमधून अनेक ऑफर्स आल्या पण तिने त्या सगळ्यांना नकार दिला. कारण सध्यातरी तिला तिच्या मल्याळम सिनेमामध्ये लक्ष देऊन काम करायचं आहे.

 

First published: March 12, 2018, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading