पुणे, 17 जानेवारी : कोरोनाच्या काळात सामान्यांचं जीवन विस्कळीत झालं. कलेचं क्षेत्रही याला अपवाद नाही. मात्र मराठी नाट्यक्षेत्रावरचं (Marathi Drama) कोरोनाचं (corona) सावट आता हळूहळू हटत असल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अगदीच 1 मिनिट 42 सेकंदांचा हा व्हिडीओ (video) आहे. मात्र प्रसन्न दिसणारी, मास्कमधूनही आनंदी चेहऱ्यावरचे भाव व्यक्त करणारी प्रिया बापट (Priya Bapat) लक्ष वेधून घेते.
व्हिडीओच्या सुरुवातीला ती सांगते आहे, की आम्ही बालगंधर्व नाट्यगृहाच्या आवारात आहोत. तिथे तिकीट खिडकीवर (ticket counter) उत्साहात फुलांचा हार चढवणारा एक माणूसही दिसतो. बाजूलाच हाऊसफुलचा बोर्ड झळकतो आहे. विशेष म्हणजे बालगंधर्वमध्ये (Balgandharv Theater) नाटकाचे प्रयोग सुरू झाल्यापासून हाऊसफुल झालेलं हे पाहिलं नाटक आहे.
प्रिया पुढं सांगते, की आज 'दादा एक गुड न्यूज आहे'चा न्यू नॉर्मल (new normal) काळातला पहिला प्रयोग होतो आहे. आणि तो हाऊसफुल झालाय.' यावर सगळे बाजूला उभे असलेले सहकलाकार उत्साहात टाळ्या वाजवत आहेत. प्रियाच्या आवाजात खूप उल्हास जाणवतो आहे.
व्हिडीओमध्ये पुढे उमेश कामत (Umesh Kamat) दिसतो. तो सांगतो की, 'या नाटकाचा हाऊसफुलचा बोर्ड आम्ही आमचं पुण्याचं बुकिंग सांभाळणारे साथी जे आहेत त्यांच्या हातानं लावला आहे. हे बुकिंग करणारे उमेशच्या बाजूलाच उभे असलेले दिसतात. उमेश बालगंधर्वच्या सगळ्या व्यवस्थापनाचे आभार मानतो आहे. 'आता आम्ही सगळे खूप मनापासून, चोख प्रयोग करू' असं उमेश म्हणतो आहे. सगळे त्याला टाळ्या वाजवत अनुमोदन देताना दिसतात. व्हिडीओच्या शेवटी प्रिया त्याच आनंदी आणि उत्साही आवाजात ' आता आम्ही प्रयोगाची तयारी करायला जातो' असं म्हणते आहे. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर (Instagram) चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.