मुंबई, 31 ऑक्टोबर : बॉलवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा दबंग 3च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. हा सिनेमा यावर्षी 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या धमाकेदार अवतारात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला. त्यानंतर आता या सिनेमात अभिनेत्री प्रीती झिंटाची नवी एंट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर प्रीती झिंटानंही सलमान खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रीतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती पोलिसाचा वेशात दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. फोटो शेअर करताना प्रीतीनं लिहिलं, यंदाच्या हॅलोवीनला यूपीमध्ये एका स्पेशल व्यक्तीला भेटले. सांगा पाहू कोण? विचार करा आणि बोला. प्रीतीचा हा फोटो प्रेक्षकांमधील उत्सुकता ताणली गेली आहे.
'दबंग 3'चं पहिलं-वहिलं गाणं रिलीज, Hud Hud Song चा हटके अंदाज
‘दबंग 3’ या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून सिनेमात सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा आणि मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर स्क्रिन शेअर करणार आहे. सोनाक्षी आणि सई यांचे लुक रिलीज झाले आहेत. सई मांजरेकर या सिनेमात सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका साकारत आहे.
लग्न-बर्थडे पार्टीमध्ये मनोरंजन करण्यास रणवीर सिंह तयार, दीपिका म्हणते...
‘दबंग 3’ या वर्षाच्या शेवटी म्हणजे 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. ख्रिसमस वीकमध्ये हा सिनेमा रिलीज होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा बोलबाला होणार असा अंदाज लावला जात आहे. याशिवाय या महिन्यात इतरही ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज होत आहेत. अर्जुन कपूरचा ‘पानिपत’ 6 डिसेंबर, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ 13 डिसेंबर आणि अक्षय कुमार आणि करीना कपूर यांचा ‘गुडन्यूज’ 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!
=========================================================================
VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त