Big Boss 12 : प्रिती झिंटाच्या परीक्षेत सलमान खान नापास

प्रिती 'भैयाजी सुपरहिट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. सिनेमा 23 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यावेळी सलमान आणि प्रितीची जुगलबंदी चांगलीच रंगली.

News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2018 05:20 PM IST

Big Boss 12 : प्रिती झिंटाच्या परीक्षेत सलमान खान नापास

मुंबई, 11 नोव्हेंबर : 'बिग बाॅस 12'मध्ये सगळे वाट पहात असतात ती वीकेण्ड वारची. यावेळी सलमान खानसोबत एखादा बाॅलिवूड कलाकार असतोच. यावेळी होती अभिनेत्री प्रिती झिंटा.


प्रिती 'भैयाजी सुपरहिट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. सिनेमा 23 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यावेळी सलमान आणि प्रितीची जुगलबंदी चांगलीच रंगली.


प्रितीची एंट्री झाल्या झाल्याच सलमाननं 'हर दिल जो प्यार करेगा'च्या हिट गाण्यावर - 'आते-जाते जो मिलता है तुमसे लगता है' डान्स केला. त्यानंतर प्रितीनं गाण्याची स्टेप दाखवायची आणि सलमाननं ती ओळखायची, असं ठरलं. तेव्हा प्रितीनं मिशन कश्मीरमधली स्टेप दाखवली. सलमाननं ते गाणं सुरुवातीला ओळखलं नाही, तो म्हणाला निमुडा निमुडा. म्हणजे त्याला आठवण आली ती ऐश्वर्याच्या गाण्याची.

Loading...
बिग बाॅस 12चा सीझन सुरू आहे. शोमध्ये जसलीन-अनुप जलोटांनी जान आणली होती. आताही त्यात बऱ्याच घटना घडतायत. या शोचा ग्रँड फिनाले आहे 30 डिसेंबरला. यावेळी एक मोठा कलाकार उपस्थित असणार आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार शोमध्ये रोहित शेट्टीसोबत एक स्टार येणार आहे. तो आहे अभिनेता रणवीर सिंग. रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीचा नवा सीझन 5 जानेवारीपासून सुरू होणार. त्याची घोषणा या फिनालेत होईल, असं म्हटलं जातंय. त्यामुळे सलमान, रणवीर यांची जुगलबंदी चांगलीच रंगणारेय.


श्रीदेवीशिवाय बोनी कपूरचा पहिला वाढदिवस, लेकानं दिलं डॅडींना सरप्राईज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...