Home /News /entertainment /

'हाऊसफुल 4 मधील बाला दिसतोय'; बहुप्रतिक्षित 'पृथ्वीराज चौहान' सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेवर चाहते नाराज

'हाऊसफुल 4 मधील बाला दिसतोय'; बहुप्रतिक्षित 'पृथ्वीराज चौहान' सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेवर चाहते नाराज

या चित्रपटाचं टीझर आज प्रदर्शित झालं असून टीझरनंतर चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    मुंबई, 15 नोव्हेंबर : कोरोना काळातले निर्बंध शिथिल होऊन चित्रपटगृह सुरू झाल्यानं बॉलिवूडमध्ये सध्या उत्साह संचारला आहे. कोरोनामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करणारे चित्रपट प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकही उत्साहानं त्यांचा आस्वाद घेत आहेत. बॉलिवूडचा अॅक्शन किंग (Bollywood Action king) अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकूळ घालत आहे. अक्षयकुमारच्या चाहत्यांनी या चित्रपटाला मोठी पसंती दिली आहे. याच दरम्यान अक्षय कुमारच्या करिअरमधल्या सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर रिलीज (Prithviraj Teaser Release) झाला आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षयकुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तो या भूमिकेत कसा दिसेल, हे महापराक्रमी व्यक्तिमत्त्व तो कसं साकारेल, याबाबत लोकांना उत्कंठा आहे. अक्षयकुमार ही भूमिका तितक्याच ताकदीनं साकारेल असा चाहत्यांना विश्वास होता; पण टीझर बघितल्यानंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. अक्षय कुमारचे चाहते निराश झाले असून, महापराक्रमी पृथ्वीराज चौहान यांची भूमिका त्याला पेलता न आल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्या ताकदीने त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व रंगवण्यात तो कमी पडल्याची भावना चाहत्यांनी मांडली आहे. अक्षय कुमारच्या मिशा (Mustach) खोट्या आणि विचित्र असल्याचं जाणवत असून, अक्षय कुमारचा याताल लूक 'हाउसफुल 4' या (Housefull 4) चित्रपटातल्या त्याच्या बाला (Bala) या भूमिकेसारखा दिसत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. या लूकमध्ये एकदा बघितल्यानंतर पुन्हा त्याच लूकमध्ये त्याला बघणं चाहत्यांना फारसं रुचणार नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. भूमिकेनुसार अक्षय कुमारच्या आवाजातही दमदारपणा जाणवत नसल्याचं निरीक्षणही चाहत्यांनी नोंदवलं आहे. महापराक्रमी पृथ्वीराज चौहान यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार त्यांचा आवाजही दमदार असणं अपेक्षित आहे; पण अक्षय कुमारनं या आघाडीवरही निराशा केली आहे. त्याचा आवाज भूमिकेला शोभत नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. हे ही वाचा-अभिनेता सोनू सूदची बहिण निवडणुकीच्या रिंगणात, लढवणार निवडणूक 'पृथ्वीराज चौहान यांचं व्यक्तिमत्त्व फारच कमकुवत साकारलं असून, प्रत्येक चित्रपटात आवाजाचं एकच मोड्युलेशन,' असं म्हणत अजमेरमधल्या एका व्यक्तीनं खंत व्यक्त केली आहे. या भूमिकेत अक्षय कुमारला बघून मजा येत नाही, इथं एक ताकदवान, शक्तिशाली कलाकार हवा होता,असं एकाने म्हटलं आहे. या भूमिकेला तो योग्य न्याय देऊ शकला नसल्याची टिप्पणी अन्य एका व्यक्तीनं केली आहे. अक्षय कुमारचा अभिनय चांगला आहे; पण सगळीकडे सेम लूक दिसत असल्याचं एका चाहत्यानं म्हटलं आहे. अपेक्षेप्रमाणे त्याच्याकडून ही भूमिका तगडी वठली नसल्याची भावना एकाने व्यक्त केली आहे. अक्षय कुमारसोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यात सोनू सूद (Sonu Sood) आणि संजय दत्त (Sanjau Dutt) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 21 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचं दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं, असून यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood actor

    पुढील बातम्या