मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi ची स्पर्धक मीनल शाहच्या सपोर्टमध्ये उतरला रोडीज फेम प्रिन्स नरूल्ला, म्हणाला...

Bigg Boss Marathi ची स्पर्धक मीनल शाहच्या सपोर्टमध्ये उतरला रोडीज फेम प्रिन्स नरूल्ला, म्हणाला...

बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन (bigg boss marathi 3) आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 20 डिसेंबर- बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन (bigg boss marathi 3) आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. दरम्यान विशाल निकम हा मराठी बिग बॉसचा पहिला फायनलिस्ट ठरला आहे. आता या आठवड्यात सोनाली पाटील घऱातून बाहेर पडली आहे. बिग बॉसला टॉप सिक्स मिळाले आहेत. यामध्ये मीनल शाह, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, विशाल निकम तसेच जय दुधाणे व उत्कर्ष शिंदे याचा समावेश आहे. आता यापैकी मीनल शहा सपोर्टमध्ये हिंदी रोडिज स्टार प्रिन्स नरूल्ला देखील उतरला आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत मीनल शाहला पाठिंबा दर्शवला आहे. प्रिन्स नरूल्लाने ट्विट करत म्हटले आहे की, मीनल 'जितके आना' असं ट्वीट करत तिला पाठिंबा दिला आहे. त्याच्या ह्या ट्वीटमुळे रोडिज गॅंग देखील मीनलच्या सपोर्टला आहे,हे सिद्ध झाले आहे. मराठी बिग बॉसचे चाहचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आहे हे आता यावरून सिद्ध देखील झाले आहे. वाचा-'फक्त 5 दिवस बाकी' म्हणत Hruta Durguleचा बॉयफ्रेंड प्रतिकसोबत Romantic अंदाज खर तर यंदाचा मराठी बिग बॉसचा सीजन काहीसा वेगळा आणि हटके ठरला आहे. घरातील प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. यात जय दुधाणे आणि मीनल शाह (meenal shah) यांची नावे वेगळ्या अर्थाने घेतली जातील कारण हे कलाकार स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मराठी बिग बॉसमध्ये (meenal shah biography) दाखल झाली आहेत. मराठी बिग बॉसच्या घरात मीनल शाहचे नाव सतत घरात तर चर्चेत असतेच आणि घराबाहेर देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे मीनल शाह ही अमराठी असताना देखील तिच्या मराठी बोलण्याने ती मराठीच असल्याचे जाणवते. अनेकजण सोशल मीडियावर तिच्या मराठी बोलण्याचे कौतुक देखील करतात. वाचा-Sohail Khan Birthday: पत्नीसह कोट्यवधींचा व्यवसाय करतो सोहेल खान मीनलचा जन्म मुंबईत झाला आहे. ती लहान असतानाच तिचे आई आणि वडील दोघेही विभक्त झाले होते. त्यामुळे मीनल आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आईनेच केला आहे. वडील गुजराती जरी असले तरी तिची आई मराठी असल्याने त्या दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. तिचे शालेय शिक्षण वांद्रे पूर्व येथील आयइएस न्यू इंग्लिश स्कूल मराठी माध्यमातून झाले होते. त्यामुळे मराठी भाषेची तिला उत्तम जाण आहे. शिवाय आई मराठी असल्याने तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष आदर देखील आहे.
First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या