Man vs Wild मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला रेकॉर्ड

Man vs Wild मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला रेकॉर्ड

विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर परदेशातही हा खास एपिसोड लोकांनी पाहिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट- नॉर्दन आयलँडचा अॅडव्हेंचरर बेअर ग्रिल्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कार्बेट पार्कच्या जंगलात अॅडव्हेंचर करताना दिसले. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर परदेशातही हा खास एपिसोड लोकांनी पाहिला. इथपर्यंत तर ठीक होतं पण हा शो जगातील सर्वात पाहिला गेलाला शो होईल याचा अंदाज कोणालाच नव्हता. बेअर ग्रिल्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मॅन वर्सेस वाइल्डचा एपिसोड हा अधिकृतरित्या जगातील सर्वात ट्रेंडिंग इव्हेंट राहिला. तब्बल 3.6 अब्ज. याने सुपर बॉल इव्हेंटलाही मागे टाकलं. या इव्हेंटचं सोशल इंप्रेशन 3.4 अब्ज आहे. त्या सर्व लोकांचे धन्यवाद ज्यांनी हा एपिसोड पाहिला.

या शोमध्ये बेअर ग्रिल्स आणि पंतप्रधान मोदी यांच्या अनेक विषयांवर चर्चा झाल्या. ग्रिल्सने मोदींना म्हटलं होतं की, जिम कॉर्बेट हे धोकादायक जंगल आहे. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले होते की, 'जर तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाल आणि निसर्गाशी संघर्ष कराल तर सगळच तुमच्या विरोधात जाईल. तेव्हा तुम्हाला मनुष्यही धोकादायक वाटेल. पण जर तुम्ही निसर्गासोबत असाल, त्याच्यावर प्रेम कराल आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न कराल तर जंगलातले प्राणीही तुमची साथ देतील.'

या शोदरम्यान, मोदी यांनी पर्यावरणाच्या सुरक्षेबद्दलही चर्चा केली. मनुष्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणं फार आवश्यक आहे. तसेच पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचं संरक्षण करणं किती महत्त्वाचं आहे आणि मानवाला आपल्या स्वार्थाच्या पुढे जाऊन विचार करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हा खास एपिसोड जगभरातल्या अनेक देशांमध्ये दाखवण्यात आला. तर भारतात हा एपिसोड 8 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यात हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषांचा समावेश होता.

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 12:50 PM IST

ताज्या बातम्या