थलायवा आता झाला Pride Icon Of India ! महानायकाच्या सन्मानाचा सुपर VIDEO

थलायवा आता झाला Pride Icon Of India ! महानायकाच्या सन्मानाचा सुपर VIDEO

गोव्यात सुरू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजे इफ्फी (IFFI) एकाच व्यासपीठावर भारतीय सिनेमातल्या दोन दिग्गजांना पाहायची संधी मिळाली. पाहा हा सुपर VIDEO

  • Share this:

पणजी, 20 नोव्हेंबर : गोव्यात सुरू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजे इफ्फी (IFFI) एकाच व्यासपीठावर भारतीय सिनेमातल्या दोन दिग्गजांना पाहायची संधी मिळाली. International Film Festival of India या चित्रपट महोत्सवाचं हे 50 वं वर्षं आहे. त्यानिमित्त दाक्षिणात्य चित्रपटांचा आयकॉन रजनीकांत उर्फ थलायवा यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलं. #PrideIconOfIndiaRAJINIKANTH हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिंग होता.

PrideIconOfIndia हा सन्मान रजनीकांत यांनी कुटुंबीय, मित्र यांच्याबरोबर फॅन्सना अर्पण केला. 50 व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन हिंदी चित्रपटांचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं. त्या वेळी या महानायकाचं स्वागत करायला थलायवा हजर होते. अमिताभ आणि रजनीकांत एकाच व्यासपीठावर आल्यावर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

44 वर्षं, 206 चित्रपट, पद्मविभूषण पुरस्कार आणि अक्षरशः लाखो फॅन्स मिरवणाऱ्या थलायवा अर्थात रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

IFFI या वेळी Golden Jubilee सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. भारत सरकारतर्फे आयोजित होणारा हा महोत्सव आशियातला हा महत्त्वाचा चित्रपट महोत्सव समजला जातो. बुधवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यासह चित्रपट क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते. करण जोहर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 20, 2019, 9:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading