'प्रेमा तुझा रंग कसा' येतेय नवा चेहरा घेऊन!

समाजात घडणारे गुन्हे प्रेक्षकांना जागरुकही करतात. पण अनेकदा प्रेम आणि गुन्हा एकत्र येतात. प्रेमात फसवणूक होते. गुन्हे घडतात आणि त्यावरच एक कार्यक्रम सुरू होतोय.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2018 09:46 AM IST

'प्रेमा तुझा रंग कसा' येतेय नवा चेहरा घेऊन!

मुंबई, 15 सप्टेंबर : आयुष्याला नवं वळण, नवी उमेद देणारी असते प्रेम ही भावना. या प्रेमावरच अनेक सिनेमे, मालिका येतात. लोकप्रिय होतात. त्यांचा टीआरपीही मोठा असतो. जसं प्रेमावरच्या कलाकृती  चालतात, तशा गुन्ह्यांवरच्याही. समाजात घडणारे गुन्हे प्रेक्षकांना जागरुकही करतात. पण अनेकदा प्रेम आणि गुन्हा एकत्र येतात. प्रेमात फसवणूक होते. गुन्हे घडतात आणि त्यावरच एक कार्यक्रम सुरू होतोय.

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत.

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथांतून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरूपं पाहायला मिळतील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजात घडणाऱ्या याच घटनांविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अनेकदा हल्ली मालिकांमध्ये नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला जातो. वेगळे विषय,वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. प्रेमा तुझा रंग कसा मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवला जाणार आहे. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. 17 सप्टेंबरपासून सुरुवात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 09:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...