लावण्यवती मेनकासाठी होणार सागर-संग्राममध्ये जंग, 'प्रेमा'तल्या याही रंगाचं दर्शन

लावण्यवती मेनकासाठी होणार सागर-संग्राममध्ये जंग, 'प्रेमा'तल्या याही रंगाचं दर्शन

अशीच एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या खास भागाचं नाव असेल 'पिंजरा'.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील 'प्रेमा तुझा रंग कसा' या कार्यक्रमातून प्रेमाचे विविध रंग आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना दाखवण्यात येतात. रविवार ३० सप्टेंबरला अशीच एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या खास भागाचं नाव असेल 'पिंजरा'.

ही गोष्ट आहे लावणीसम्राज्ञी मेनकाची, तिच्या रूपावर भुललेल्या संग्रामची आणि आपल्या फायद्यासाठी मेनकाला मिळवू पाहणाऱ्या सागरची. तमाशाचे फड रंगवणाऱ्या मेनकेची पंचक्रोशीत चर्चा असते. पैशांचा माज असलेल्या संग्रामला मेनकेविषयी माहिती मिळते आणि तिच्या शोधात तो निघतो. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडतो.

पण गोष्ट इथेच संपत नाही. संग्राम आणि मेनकेच्या या लव्हस्टोरीमध्ये एण्ट्री होते ती सागरची. सागर त्याच्या सिनेमासाठी एका लावणी डान्सरच्या शोधात असतो, आणि त्याला मेनकाविषयी समजतं. तिथेच सुरुवात होते नव्या युद्धाला. मेनकावर जीव ओवाळून टाकणारा संग्राम विरुद्ध सागर अशी जंग छेडली जाते. प्रेमाच्या या लढाईत विजय नेमका कुणाचा होतो?

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करतोय.

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथांतून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरूपं पाहायला मिळतील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजात घडणाऱ्या याच घटनांविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अनेकदा हल्ली मालिकांमध्ये नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला जातो. वेगळे विषय,वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. प्रेमा तुझा रंग कसा मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवला जाणार आहे.

सोनम कपूरचा फॅशन जलवा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2018 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading