'प्रेमा'तल्या अनेक 'रंगां'बद्दल सांगतोय अजिंक्य देव

‘प्रेमा तुझा रंग कसा’बद्दल त्याला खूप सकारात्मक वाटतं. ही सीरिज समाजाला उपयोगी आहे, असं अजिंक्यचं म्हणणं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2018 03:00 PM IST

'प्रेमा'तल्या अनेक 'रंगां'बद्दल सांगतोय अजिंक्य देव

मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेता अजिंक्य देव ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करतोय. अजिंक्य देव त्याच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. या मालिकेबद्दल अजिंक्य सांगतो, 'या कार्यक्रमाचा मुळ उद्देश समाजात जागरुकता वाढवणं आहे असं मला वाटतं'

तो म्हणतो, 'समाजात घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. पण त्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि अश्या गोष्टींपासून सावध राहण्याचं आवाहन ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या माध्यमातून करण्यात येतंय. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे. शिवाय समाजामध्ये चांगला विचार रुजवण्याचा स्टार प्रवाह वाहिनी प्रयत्न करतेय. त्यांच्या या प्रवासात मला सामील होता आलं याचा आनंदही आहे.'

अजिंक्यनं  खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलंय. त्याबद्दल तो म्हणतो, 'हो खरंय. हिंदी टेलिव्हिजनवर माझी नुकतीच '24' सीरिज येऊन गेली. पण मराठी टेलिव्हिजनवर मी खूप दिवसांनंतर दिसणार आहे. मुळात एखादा शो मनापासून आवडला तरंच मी तो स्वीकारतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण मला भावलं. याआधी ‘स्टार प्रवाह’च्याच स्वप्नांच्या पलिकडलेमध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.'

‘प्रेमा तुझा रंग कसा’बद्दल त्याला खूप सकारात्मक वाटतं. ही सीरिज समाजाला उपयोगी आहे, असं अजिंक्यचं म्हणणं आहे.  'सध्या मराठीमध्ये गुन्ह्यांवर आधारित एकही कार्यक्रम नाहीय. शिवाय प्रत्येक दिवशी नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक एपिसोडला नवी गोष्ट आणि नवे कलाकार असल्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमा पहात असल्याचा फील येईल. समाजात ज्या घटना घडतात त्याचंच प्रतिबिंब या कार्यक्रमामधून दाखवण्यात येतंय. माझ्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा आहे. मला महाराष्ट्रभरातून अभिनंदन करणारे बरेच फोन आले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चे एपिसोड्स मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.'

VIRAL VIDEO : डान्सिंग अंकल आठवतायेत.. मग हे डुप्लिकेट मनोज कुमार बघाच!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...