Elec-widget

प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी नेस वाडीयांना कोर्टाचा दिलासा, एफआयआर रद्द करण्याचे आदेश

प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी नेस वाडीयांना कोर्टाचा दिलासा, एफआयआर रद्द करण्याचे आदेश

२०१४ साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. तर या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 10 आॅक्टोबर : मुंबई हायकोर्टाने उद्योजक नेस वाडीयाला मोठा दिलासा देत अभिनेत्री प्रीती झिंटानं त्याच्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे यांच्या चेंबरमध्ये ही सुनावणी झाली. प्रीती झिंटा आणि नेस वाडीया आज दोघेही यावेळी हजर होते. गेल्या सुनावणी वेळी दोघांनीही कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. २०१४ साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. तर या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती.

नेमक्या कोणत्या कारणामुळे एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. नेसनं माफी मागण्याची तयारी दाखवली तर आपण केस मागे घेऊ असं प्रीतीच्या वतीनं हायकोर्टाला गेल्या सुनावणीवेळी सांगण्यात आलं होतं.

तर नेसनं मात्र माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांचे वकील आभात फोंडा यांनी म्हटलं होतं. या सगळ्या प्रकरणातून प्रीती झिंटा केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आभात फोंडा यांनी केला होता.

मात्र आम्ही लेखी माफीची अपेक्षाच करत नाही असं प्रीतीच्या वकिलांनी स्पष्ट केलं होतं. यावर झालं तेवढ पुरे झालं आता हे प्रकरण समोपचारानं मिटवा असं मत व्यक्त करत न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी पुढील सुनावणीच्यावेळी नेस वाडिया आणि प्रीती झिंटाला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

Loading...

आज दोन्ही बाजूच्या वकीलांनीही नेसनं माफी मागितली की नाही हे सांगण्यास कोर्टाने मनाई केली असल्याचं सुनावणी नंतर बाहेर आल्यावर सांगितलं. त्यामुळे नेसनं माफी मागितली की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

बाॅलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं ४ वर्षांपूर्वी उद्योजक मित्र नेस वाडीया याच्या विरोधात दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांनी २०० पानी आरोपपत्र मेट्रोपाॅलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेड कोर्टात दाखल केलं होतं.

आयपीसी कलम ३५४ म्हणजे हल्ला करणं, कलम ५०६ गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणं, कलम ५०९ विनयभंग करणे या कलमांअतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यावेळी नेस कोर्टात हजर होता. त्याला २० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं. त्यानंतर खटला सुरू होण्याआधीच नेस वाडियानं आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव होती.

काय आहे प्रकरण ?

३० मे २०१४ रोजी पंजाब एलेव्हन किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरू असताना प्रीती झिंटाला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून वाडीया यानं तिकीट वाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांदेखत शिवीगाळ केली, त्यानंतर प्रीतीनं आपली जागा बदलली. पण त्यानं नेसचं समाधान झालं नाही त्यानं सगळ्या टीम सदस्यांच्यादेखत आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केलं असा आरोप प्रीतीनं केला आहे. तसंच आपले हात जोरात खेचत आपल्यावर नेसनं हल्ला केला असा आरोप प्रीतीनं केला होता. नेसनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

२००५ ते २०१० प्रीती आणि नेस एकमेकांना डेट करत होते पण २०१० साली ते वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. आयपीएलमधल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे संयुक्त मालक आहेत.

===============================================================

VIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 06:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...