मुंबई, 31 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा आज वाढदिवस प्रीतीनं तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हिट सिनेमा दिले आहेत. पण एक वादग्रस्त म्हणा किंवा प्रीतीच्या साहसाचा किस्सा म्हणा आजही सर्वांच्या लक्षात आहे. हा किस्सा तेव्हाचा आहे. जेव्हा प्रीतीनं अंडरवर्ल्डच्या डॉनशी टक्कर घेत त्याच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. हा किस्सा घडला होता तो 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ सिनेमापासून.
सूत्रांच्या माहितीनुसार अब्बास मस्तान ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ या सिनेमाचं दिग्दर्शन करत होते. या सिनेमात प्रीति झिंटा, रानी मुखर्जी आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत होते. कागदोपत्री या सिनेमाची निर्मिती हिरा व्यापारी भरत शाह आणि प्रोड्युसर नाजिम रिजवी करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र या सिनेमाच्या निर्मितीसाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा पैसा लागला होता.
रितेश देशमुखच्या मुलांनी गांधीजींबद्दल असं काय म्हटलं, पाहा VIDEO
View this post on InstagramSunshine after the rain is pure happiness #weekendvibes #sunshine #ting @ashguptaslife
याबाबत सलमान खान, शाहरुख खान, राकेश रोशन यांसारख्या व्यक्तींनी काही बोलण्यास नकार दिला होता. प्रीतीनं मात्र छोटा शकीलच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. प्रीतीनं आपल्याला वारंवार धमक्यांचे फोन येत असल्याचं साक्ष दिली होती. कोर्टानं प्रीतीला याबाबत साक्ष देण्यासाठी बोलवलं होतं. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं असल्यानं प्रीतीची साक्ष रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानुसार भरत शाहला अटक करण्यात आली होती.
लोक समजायचे अमरोहींची दत्तक मुलगी, अभिनेत्रीनं नाकारली 600 कोटींची संपत्ती
भरत शाह याला सिनेकलाकरांकडून जबरदस्तीन वसूली करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यासोबतच निर्माता नजीम रिझवी यालाही दोषी ठरवण्यात आलं. शाह याच्यावर भारतीय दंडविधान कलम 118 नुसार केस चालवण्यात आली. तर नजीम रिझवीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. प्रीतीनं दाखवलेल्या धाडसानं संपूर्ण सिने इंडस्ट्रीला हलवून टाकलं.
इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत प्रीती या प्रकरणावर बिनधास्त बोलली. ती म्हणाली, 'एक वेळ अशी होती की मला अंडरवर्ल्ड कडून धमक्यांचे फोन येत होते. त्यावेळी मी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. पण जर मला माहित असतं की अंडरवर्ल्डला घाबरुन कोणीच बोलण्यासाठी पुढे येणार नाही तर मी घाबरुन कधीच यावर बोलले नसते.'
प्रीती पुढे म्हणाली, 'त्यावेळी +92 वरुन सुरू होणाऱ्या नंबरचे कॉल रिसिव्ह करणंच बंद केलं होतं. त्यावेळी एक प्रोटोकॉल होता की जर +92 तुम्हाला कॉल येत असेल तर तुमचे कॉल रेकॉर्ड व्हायला सुरू होतो. त्यावेळी मला लालकृष्ण अडवाणी यांनी फोन करुन हा विश्वास दिला होता की मला घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांनी मला सुरक्षा देऊ केली होती मात्र ती मी कधीच घेतली नाही. पण साध्या वर्दीतले काही पोलिस मात्र माझ्या सिनेमाच्या सेटवर नेहमी तैनात असत.'
सनी लिओनीला क्रिकेट नाही तर 'या' खास कारणासाठी आवडतो कॅप्टनकुल धोनी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Priti zinta