Underwater शूटनंतर प्रेग्नंट समीरा रेड्डीने 9 व्या महिन्यात शेअर केला हा No makeup VIDEO

Underwater शूटनंतर प्रेग्नंट समीरा रेड्डीने 9 व्या महिन्यात शेअर केला हा No makeup VIDEO

समीरानं काही दिवसांपूर्वी अंडर वॉटर फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आता तिनं एक व्हिडिओ सुद्धा शोअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नसी फेज एन्जॉय करत आहे. समीरा रेड्डी सोशल मीडियावर सध्या फार सक्रिय आहे. ती आपल्या प्रेग्नंसी, बॉडी शेमिंगवर मनमोकळेपणाने बोलते. याआधीही समीराचे प्रेग्नंसीमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान तिने बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तसेच तिनं काही दिवसांपूर्वी अंडर वॉटर फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आता तिच्या सोशल मीडियाअकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमधून तिनं प्रेग्नंट वूमन्ससाठी खास मेसेज दिला आहे.

समीरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. समीरानं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ही आहे खऱ्या आयुष्यातली मी, मला माहीत आहे यावर लोक टीका करतील मात्र मी कोणीही मला काय बोलतं याला घाबरत नाही. मी तुम्हाला दाखवू इच्छिते की, मेकअपशिवाय आणि सकाळी उठल्यावर माझा चेहरा कसा असतो आणि हे सर्व सेलिब्रेट करायला मला खूप आवडतं.’ समीराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. समीरा तिची प्रेग्नन्सी खूप वेगवेगळ्या प्रकारे एंजॉय करत आहे.

वयाच्या 42 वर्षी या अभिनेत्रीनं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी तिने अण्डरवॉटर फोटोशूट केलं. फोटोमध्ये समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या होत्या. तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट केलाच शिवाय संपूर्ण फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. समीराचे हे अंडरवॉटर फोटो लोकाच्या पसंतीत उतरले होते.

या 10 सेलिब्रिटींनी शेअर केले हॉट फोटो, एक तर बॉलिवूडची स्टार

अनेकांनी या फोटोंवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र तर काहींनी ‘आता हेच करायचं राहिलेलं…’ अशाही कमेंट दिल्या. तर काहींनी बाळाला रिस्कमध्ये टाकू नको अशा सुचनाही दिल्या. याआधी कोणत्याही अभिनेत्रीने नवव्या महिन्यात पाण्यात जाऊन फोटोशूट केलं नव्हतं. समीराने 2014 मध्ये व्यावसायिक अक्षय वर्देशी लग्न केलं. 2015 मध्ये ती एका मुलाची आई झाली. आता समीरा दुसऱ्यांदा आई व्हायला सज्ज झाली आहे.

श्रीदेवींचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच, IPS अधिकाऱ्याचा पुराव्यासकट दावा

==================================================================

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

First published: July 12, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या