मराठमोळ्या 'झिंगाट'वर मुलीसोबत नाचली प्रेग्नंट ईशा देओल

मराठमोळ्या 'झिंगाट'वर मुलीसोबत नाचली प्रेग्नंट ईशा देओल

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतीच तिची मुलगी राध्या एक वर्षाची झाली.

  • Share this:

मुंबई, १ एप्रिल- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतीच तिची मुलगी राध्या एक वर्षाची झाली. सध्या ईशा तिचा प्रत्येक दिवस मनमुराद जगण्याला प्राधान्य देत आहे. नुकतेच ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राध्यासोबतचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती राध्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

ईशा हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच डान्स करते असं अनेकजण म्हणतात. ईशाने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात काम केलं. मात्र आई- वडिलांप्रमाणे तिला सिनेसृष्टीत यश मिळालं नाही. आता लग्नानंतर तिने आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला प्राधान्य देत आहे.

सध्या ज्या व्हिडिओबद्दल आम्ही बोलत आहोत त्यात ईशा मुलीला कमरेवर घेऊन सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. फोटोंमध्ये आई- मुलीचं बॉण्डिंग लक्षवेधी आहे. राध्याच्या शाळेतील अॅन्युअल डेला आई- मुलीने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना ईशाने लिहिले की, ‘राध्याने तिच्या आईसोबत पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केले.’ यावेळी ईशा आणि राध्याने मराठमोळी वेशभूषा केली होती. दोघींनी नऊवारी साडी नेसली होती एवढंच नव्हे तर दोघींनी चंद्रकोरही लावली होती. दोघंही या पेहरावात फार सुंदर दिसत होत्या. ईशा आणि राध्याने केसात गजरा माळला होता. या पेहरावात राध्या फारच क्यूट दिसत होती. संपूर्ण कार्यक्रमात राध्यावरची नजर हटत नव्हती.

या खास क्षणाबद्दल ईशा देओल म्हणाली की, ‘जेव्हापासून राध्याचा जन्म झालाय तेव्हापासून गाण्याच्या तालावर आपलं शरीर हलवते. जेव्हा राध्या माझ्यासोबत अॅन्युअल डेला नाचली तो क्षण माझ्यासाठी आणि पती भरत तख्तानीसाठी फार खास होता. मला सर्व गोष्टी योग्य हव्या होत्या म्हणून डान्सप्रमाणेच आम्ही कपड्यांची निवड केली.’ ईशा देओल स्वतः ओडिसी डान्सर आहे. पारंपरिक नृत्यात ती आई हेमा मालिनी यांचा वारसा पुढे नेत आहे.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

First published: April 1, 2019, 8:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading