मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: गरोदर आलिया बनली बिझनेस वुमेन; सुरु केला 'हा' नवा व्यवसाय

VIDEO: गरोदर आलिया बनली बिझनेस वुमेन; सुरु केला 'हा' नवा व्यवसाय

आलिया भट्ट

आलिया भट्ट

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी लवकरच आई-बाबा होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असून सोशल मीडियावर याचीच चर्चा कायम पहायला मिळतेय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 1 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी लवकरच आई-बाबा होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असून सोशल मीडियावर याचीच चर्चा कायम पहायला मिळतेय. आलिया सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. गरोदरपणातही ती तिच्या आरोग्यासोबत कामावर लक्ष केंद्रित करत आहे. अशातच तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आलीये.

आलिया भट्टने आता नवीन बिझनेस सुरु केला असल्याचं समोर आलंय. ती मॅटर्निटी वेअर ब्रँड लॉन्च करत असून इन्स्टाग्रामवर याची झलक शेअर केली आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'एडमम्मा मॅटर्निटी वेअर, खूप प्रेमाने बनवलेले. मामा-बीन्ससाठी. 14 ऑक्टोबर रोजी लॉन्च होत आहे'. आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहे.

हेही वाचा -  साऊथ स्टार सूर्याच्या सिनेमाला एक नव्हे तब्बल 5 राष्ट्रीय पुरस्कार; पोस्ट करत पत्नी म्हणली...

याआधी शुक्रवारी आलियाने काही पोस्ट शेअर करून या मॅटर्निटी रेंजबद्दल माहिती दिली होती. आलिया भट्टने पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते की ती तिच्या होणाऱ्या मुलाबद्दल खूप उत्साहित आहे आणि त्यासाठी तयारी करत आहे.

आलिया भट्ट गरोदरपणातही पूर्ण उत्साहाने काम करतेय. हे पाहून तिचे चाहते खूप आनंदी आणि प्रभावित झाले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, 'इंडस्ट्रीत अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी गरोदरपणातही खूप काम केले आहे. आता या यादीत आलिया भट्टच्या नावाचाही समावेश झाला आहे'.

दरम्यान, 14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी घरात एका खाजगी समारंभात लग्न केले. यामध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांचा सहभाग होता. यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गरदोरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्काच बसला.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood actress, Pregnancy