'या' प्रेग्नंट बॉलिवूड अभिनेत्रीचा अल्ट्रा साउंड व्हिडिओ होतोय व्हायरल

'या' प्रेग्नंट बॉलिवूड अभिनेत्रीचा अल्ट्रा साउंड व्हिडिओ होतोय व्हायरल

चाहत्यांनी तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जून : बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे खूप चर्चेत आहेत. मागच्या काही काळापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत आणि ती सुद्धा बिनधास्तपणे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. पण सध्या तिची चर्चा एका वेगळ्याच कारणानं होतेय. 23 आठवड्याची प्रेग्नंट एमीचा अल्ट्रा साउंड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तिच्या पोटातील बाळाची हालचाल दिसत आहे. हा व्हिडिओ एमीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला होता.

एमीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर यावर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. ते एमीला बाळाची आणि स्वतःची काळजी घ्यायला सांगत आहेत. एका युजरनं म्हटलंय की, एमीला मुलगा होईल. तर दुसऱ्या एका युजर लिहिलं, 'देव मुलाचं रक्षण करो आणि त्याला कोणाची नजर लागू नये.' व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एमीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. एमी आणि तिचा होणारा नवरा जॉर्ज त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी खूपच उत्सुक आहेत.

Bharat ची अभिनेत्री दिशा पाटनी सारखी फिगर हवी, फॉलो 'हा' डाएट प्लान

 

View this post on Instagram

 

Amy Jackson shares the beautiful glimpse of her baby in Ultrasound!❤️❤️ Follow @glamourupdate * * #glamourupdate @iamamyjackson

A post shared by Glamour Update (@glamourupdate) on

एमी आणि जॉर्ज एकमेकांना 2015 पासून डेट करत आहेत मात्र त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी साखरपुड्याचं वृत्त सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांशी शेअर केलं. त्यामुळे आता बाळाच्या जन्मानंतरच हे दोघंही लग्न करतील असं म्हटलं जात आहे. एमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या 2.0मध्ये दिसली होती. याशिवाय तिनं अक्षय कुमार सोबत सिंग इज ब्लिंग या सिनेमात काम केलं आहे. एमीनं एक दिवाना था या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

Bharat Review : सलमान 'आजोबां'चं काम फर्स्टक्लास पण... मिळालेत 'इतके' स्टार

First published: June 5, 2019, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading