• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'या' अभिनेत्रीने सुरू केलं मराठी सिनेमाची थीम असलेलं पहिलं रेस्टॉरंट

'या' अभिनेत्रीने सुरू केलं मराठी सिनेमाची थीम असलेलं पहिलं रेस्टॉरंट

अभिनेत्री प्रिया बेर्डे (preeya laxmikant berde ) यांची पुण्यात दोन हॉटेल आहेत. ​​आता त्यांच्या मराठमोळा झटकामधील गावाकडील अस्सल चवीची मेजवानी खवय्ये मंडळींना पुन्हा चाखता येणार आहे.

 • Share this:
  मुंबई 2 नोव्हेंबर :  मराठी कलाकार आता अभिनयासोबत व्यवसायात देखील उतरत आहे. मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेर्डे (preeya laxmikant berde ) यांचा देखील हॉटेल व्यवसाय आहे. त्यांची पुण्यात दोन हॉटेल आहेत. ​​आता मराठमोळा झटकामधील गावाकडील अस्सल चवीची मेजवानी खवय्ये मंडळींना पुन्हा चाखता येणार आहे. अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पूर्वीचे हे हॉटेल पुणेकरांच्या खास पसंतीचे, अनेक दिग्ग्ज कलाकार मंडळी आणि चोखंदळ खवय्यांनी त्यांच्या हॉटेलला भेट देऊन पदार्थांचे कौतुक देखील केले आहे.बावधन जवळच असलेल्या पौंड रोडवर ‘चख ले’ हे हॉटेल मागे सुरु केले होते. पण मराठमोळा झटकाची सर खवय्ये विसरू शकले नाहीत. आता नव्याने सुरु केलेल्या या रेस्टोरंट मध्ये मराठी चित्रपटांच्या थीमवर आधारित गोष्टींचा रुचकर जेवणासोबत आस्वाद घेता येणार आहे.
  प्रिया बेर्डे यांनी इन्स्टा पोस्ट करत याची माहिती दिली आहे. या हॉटलेची खासीयतलक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या धमाल विनोदी जोडीचा खास आढावा यात असणार आहे. “मराठमोळा झटका” हे मराठी सिनेमाच्या थीमचं पहिलं वहिलं रेस्टॉरंट सुरु करण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे, “मागील काळात सगळेच होरपळून निघाले त्यात आमच्या मनोरंजन सृष्टी बरोबर आमच्या हॉटेल वर पण परिणाम झाला होता, खरंतर शर्थीने आम्ही ते चालवलं होत पण मार्च मध्ये आम्हाला ते बंद करावं लागलं, ज्या दिवशी बंद केलं त्याच दिवशी ठरवलं आता परत जोमाने उतरायचं, परिस्थिती ला आव्हान देणं आणि तिच्याशी दोन हात करणं हा आता स्वभाव झालाय, त्यानुसार परत आम्ही कंबर कसली आणि आता जोरात सुरवात करतोय आशीर्वाद असावा.. श्री स्वामी समर्थाय नमः” वाचा : 'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा आणि दिपूने घेतली राज ठाकरेंची भेट प्रिया ​लक्ष्मीकांत ​बेर्डे या अभिनय, राजकारण आणि हॉटेल व्यवसाय अशा तिन्ही क्षेत्राची धुरा ​समर्थपणे ​सांभाळताना दिसत आहेत​, त्यांच्या नव्या व्यवसायानिमित्त ​चित्रपटसृष्टीतून शुभेच्छा ​आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. ​​
  Published by:News18 Trending Desk
  First published: