Home /News /entertainment /

Pravin Tarde Exclusive Interview: एका अनोळखी माणसाने 'धर्मवीर'च्या शूटिंगदरम्यान तरडेंना देऊ केले तब्ब्ल 21 लाख रुपये, हे होतं कारण

Pravin Tarde Exclusive Interview: एका अनोळखी माणसाने 'धर्मवीर'च्या शूटिंगदरम्यान तरडेंना देऊ केले तब्ब्ल 21 लाख रुपये, हे होतं कारण

EXCLUSIVE INTERVIEW Pravin Tarde: 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर' आणि आता येऊ घातलेला 'सरसेनापती हंबीरराव' अशा हिट चित्रपटांशी जोडलेलं नाव अर्थात प्रवीण विठ्ठल तरडे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचीत..

    मुंबई 27 मे: प्रवीण तरडे हे (Pravin Tarde) नाव आता मराठी इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. मुळशी पॅटर्नसारखा (Mulshi Pattern)सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर धर्मवीर (Dharmaveer superhit movie) आणि आता नव्याने येणारा सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटात यशस्वीपणे लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी ऑल राऊंडर कामगिरी करणाऱ्या प्रवीण तरडे यांच्याशी झालेला हा संवाद 1.सरसेनापती हंबीररावमध्ये तुम्ही दिग्दर्शन आणि अभिनय अशी धुरा सांभाळत आहात. एकाच वेळी एवढी जबाबदारी पेलताना कसरत नाही झाली का? सरसेनापती हंबीरराव हा महाराष्ट्राचा महासिनेमा म्हणून आम्ही प्रस्तुत करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सरसेनापतींची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही भूमिका पार पाडताना त्या त्या पद्धतीने मी दोघांनाही न्याय द्यायचा प्रयत्न केला. अभिनयासाठी मला व्यायामावरही लक्ष द्यावं लागलं. त्यावेळेला जी गरज होती तेवढा वेळ मी दोन्ही कामांना दिला. 2.मराठीसह बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक्सची रीघ लागली आहे. यात आपण उतरावं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्तवर 2 भागांचा चित्रपट करावा असं का वाटलं? मुळात आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट व्हावा ही निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांची इच्छा होती. मंगेश देसाई हे ठाण्यात राहत असल्याने त्यांचा ही आनंद दिघ्यांशी संबंध आला होता. आपलं आयुष्य लोकांसाठी वाहून टाकलेल्या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनावा अशी इच्छा मंगेशने मला बोलून दाखवली. आणि मग या चित्रपटावर  योगायोगाने काम सुरु झालं. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे, एवढ्या कथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला एका भागात दाखवणं हा अन्याय ठरला असता म्हणून दुसरा भागही प्रदर्शित करणार आहे. 3.कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवताना प्रत्येकाच्या भावनांचा विचार करावा लागतो. मतांच्या विविधतेमुळे लोकांना भलतंच काही वाटेल का अशी एक भीती असते. तुमच्यावर ते न होऊ देण्याची एक खूप मोठी जबाबदारी आहे हे कधी जाणवलं? राजकीय व्यक्तींवर चित्रपट बनवताना ही भीती असते हे अगदी बरोबर आहे. आनंद दिघे साहेबांना मोठ्या पडद्यावर दाखवणं ही खूप मोठी जबाबदारी होती याच कारण लोकांच्या मनात राजकारण्यांबद्दल असलेली तेढ. ती तेढ असतानाही चित्रपट बनवणं थोडं आव्हानात्मक होतं. पण महाराष्ट्रात एवढे मोठे नेते, राजकारणी होऊन गेले ज्यांचं काम प्रेक्षकांसमोर येणं महत्त्वाचं आहे. त्यात दिघे साहेबांचं समाजासाठी असलेलं काम जगजाहीर आहे. त्यांचं आयुष्य एवढं नाट्यमय होतं की ते दाखवणं खरंच गरजेचं होतं. हे ही वाचा- 'कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा..' अमृता खानविलकरनं कुणासाठी जोडले हात? 4. एवढ्या मोठ्या नेत्याच्या आयुष्यावर चित्रपट करताना आलेला एखादा प्रसंग आठवतो का ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली. अगदी नाट्यमय वाटेल असा एक किस्सा  आहे. धर्मवीरचं ठाण्यात शूटिंग करताना रोज अशी अनेक माणसं सेटवर यायची जी लाखोंनी पैसे देऊ करायची. तिथल्या लोकांना साहेबांबद्दल एवढी श्रद्धा वाटते की लोक काहीतरी हातभार म्हणून पैसे द्यायला यायचे. एका माणसाने तर चक्क 21 लाख रुपये देऊ केले होते. तर दुसरीकडे एका वृद्ध आजींनी येऊन 200 रुपये हातभार लावण्यासाठी देऊ केले होते.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या