मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई करतोय हे काम ; प्रवीण तरडे धावला मित्राच्या मदतीस

मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई करतोय हे काम ; प्रवीण तरडे धावला मित्राच्या मदतीस

नुकतेच प्रवीण तरडेने रमेश परदेशीच्या घरी जाऊन त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलेली पाहायला ​मिळाली. याचा एक व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नुकतेच प्रवीण तरडेने रमेश परदेशीच्या घरी जाऊन त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलेली पाहायला ​मिळाली. याचा एक व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नुकतेच प्रवीण तरडेने रमेश परदेशीच्या घरी जाऊन त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलेली पाहायला ​मिळाली. याचा एक व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई, 28 ऑक्टोबर : मराठमोळा अभिनेता प्रवीण  (pravin tarde)तरडेने आपल्या चित्रपटातून नेहमीच आपल्या मित्र कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे​. त्यात रमेश परदेशीचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटात पिट्या भाईची भूमिका रमेश परदेशी याने साकारली आहे. प्रवीण तरडे आणि रमेश परदेशीची (Ramesh Pardeshi)दोस्ती जगजाहीर आहे. नुकतेच प्रवीण तरडेने रमेश परदेशीच्या घरी जाऊन त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलेली पाहायला ​मिळाली. याचा एक व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यावेळी प्रवीण तरडे म्हणाले की, मित्राला त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलीच पाहिजे..​ ​जसं माझ्या गावाला शेताची कामं असतात​,. भात लावायला किंवा काढायला ​येतो ​त्यावेळी पिट्या ​स्वतःहून येतो. पिट्याचा रांजण, कुंड्या, मडकी,​ बोळकी, किल्ले बनवून ते रंगवणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. पौंड फाट्यावर​ पिट्याचे ​जुनं मोठं घर आहे,​ तिथे तो दरवर्षी हे काम करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी येतो. मी देखील त्याच्या या पारंपरिक व्यवसायाला नेहमी​​ मदत करायला येतो. जेव्हा आम्ही दुसरी तिसरी इयत्तेत शिकायला होतो त्यावेळी देखील मी पिट्याला या कामात मदत करायला यायचो​.

परंपरागत व्यवसाय टिकलेच पाहिजेत असे म्हणून प्रवीण तरडेने रमेश परदेशीला या पारंपरिक व्यवसायाला शुभेच्छा देत एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्याची प्रवीण तरडेची तळमळ त्याच्या ह्या व्हिडिओतून जाणवते.

वाचा : 'काय फरक तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये?', सुमितची पोस्ट चर्चेत

देऊळबंद, फत्तेशीकस्त, बेरीज वजाबाकी अशा आणखी काही चित्रपटातून रमेश परदेशी यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. तर काही मालिका तसेच नाटकांतून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. रमेश परदेशी आणि प्रवीण तरडे यांची मैत्री अगदी बालपणापासूनची. ​कला क्षेत्रात एकत्रित काम करीत असल्याने​ आजही त्यांची मैत्री अशीच अबाधित राहिलेली पाहायला मिळत आहे.

वाचा : 'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा नो मेकअप लुक पाहून नेटकरी म्हणाले....

प्रवीण तरडे हा उत्तम नट तर आहेच पण उत्तम लेखक आणि दिग्दर्शक​ ​ही आहे . मात्र ​प्रसिद्धीच्या ऐन झोतातही त्याने जपलेली ही मैत्री खरोख​रंच वाखाणण्याजोगी आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment