मुंबई 26 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणामुळं देशभरातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अगदी नामांकित सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले. दरम्यान मराठी अभिनेते अमोल धावडे (Amol Dhavade) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेते दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यानं फेसबुक पोस्टद्वारे ही दु:खद बातमी प्रेक्षकांना दिली. अमोल धावडे हे प्रवीणचे खूप चांगले मित्र होते. देवूळबंद , मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. येत्या काळात ते हंबीरराव या चित्रपटातही एक महत्वाची भूमिका साकारणार होते. अमोल यांच्या निधनामुळं प्रवीणला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यानं सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
अवश्य पाहा - स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय; केवळ याच गोष्टीसाठी करणार सोशल मीडियाचा वापर
“माझा मित्र अमोल धावडे गेला, कोरोनानं आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या 15 दिवसात खाल्ला. किती आठवणी ..? 1996 साली मी लिहिलेल्या “आणखी एक पुणेकर ” या एकांकीकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणुन, माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच.. देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच .. 11 मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्ता पर्यन्त त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅाग ने सुरू करायचो .. हा माझा एक श्रध्देचा भाग होता.. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा .. 1999 साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा .. एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या , सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास .. तुझा शेवटचा मेसेज होता ” बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव ” राहिलाच शेवटी .. डोळ्यातील पाणी थांबत नाही ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला “सुखी जीव “ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा.” अशा शब्दात त्यानं आपलं दु:ख व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid-19, Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment